Accidental death: नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला.या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला,तर कारमधील दोन प्रवासी..
डोंगरकडा (Accidental death) : नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला.या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला,तर कारमधील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. चोरंबा फाट्याजवळील पेट्रोल पंप परिसरात हा अपघात झाला.
या (Accidental death) अपघातात संदीप हिरामण पवार वय ३० राहणार झुंनझूनवाडी, ता. कळमनुरी, जि. हिंगोली यांचा जागीच मृत्यू झाला.मिळालेल्या माहितीनुसार,नांदेडकडून वारंगाकडे जाणार्या अज्ञात ट्रकने पुढे जात असलेल्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिली.धडकेमुळे कार अनियंत्रित होऊन समोरून जात असलेल्या दुचाकीवर आदळली.कारची जोरदार धडक बसल्याने दुचाकीस्वार संदीप पवार यांचा जागीच मृत्यू झाला.
कारमधील दोन प्रवासी रा.सोनखेड गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाता नंतर अज्ञात ट्रकचालक ट्रक घेऊन घटनास्थळावरून पसार झाला. (Accidental death) घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्गावरील १०३३ आणि १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या.या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
कुटूंबाचा आधार हरपला
संदीप पवार हे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते.त्यांच्या पश्चात आई-वडील,पत्नी,एक मुलगी आणि दोन मुले असा परिवार आहे.त्यांच्या अपघाती निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.