Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > विदर्भ > वर्धा

Leopard Rescue

मोकळ्या जंगलातून जाळीत अडकला बिबट्या; वन विभागाच्या तत्परतेने वाचला जीव

मोकळ्या जंगलात मुक्तपणे वावरणारा बिबट्या अचानक संरक्षक जाळीत अडकला. बाहेर पडण्यासाठी त्याची सुरू असलेली धडपड पाहून परिसरात चिंता निर्माण झाली.


मोकळ्या जंगलातून जाळीत अडकला बिबट्या वन विभागाच्या तत्परतेने वाचला जीव

Leopard Rescue |

सीएडी कॅम्प, पुलगाव येथे थरारक रेस्क्यू ऑपरेशन; सावधगिरीने बिबट्याची सुखरूप सुटका

पुलगाव : मोकळ्या जंगलात मुक्तपणे वावरणारा बिबट्या अचानक संरक्षक जाळीत अडकला. बाहेर पडण्यासाठी त्याची सुरू असलेली धडपड पाहून परिसरात चिंता निर्माण झाली. माहिती मिळताच वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि अत्यंत सावधगिरीने रेस्क्यू ऑपरेशन राबवत बिबट्याची सुखरूप सुटका केली.

सीएडी कॅम्प, पुलगाव परिसरातील संरक्षक जाळीत बिबट्या अडकल्याची माहिती वन विभागाला मिळाली. बिबट्या घाबरलेल्या अवस्थेत असल्याने बचाव कार्य अत्यंत आव्हानात्मक होते. चुकीची किंवा घाईची हालचाल बिबट्याच्या तसेच बचाव पथकाच्या जीवासाठी धोकादायक ठरू शकत होती. त्यामुळे पथकाने परिस्थितीचा बारकाईने अंदाज घेत नियोजनबद्ध पद्धतीने मोहीम राबवली.

उपवनसंरक्षक हरविर सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले. आवश्यक खबरदारी घेत बिबट्याला सुरक्षितरीत्या नियंत्रित करण्यात आले आणि जाळीतून बाहेर काढण्यात आले.

यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अमित झा यांनी बिबट्याची तपासणी केली. त्याची प्रकृती समाधानकारक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वन विभागाच्या पथकाने सुटकेचा नि:श्वास सोडला.

या मोहिमेत सीएडी कॅम्प, पुलगावचे अधिकारी आयएसओ कॅप्टन चिराग, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अमित झा, करुणाश्रम, वर्धाचे सचिव आशिष गोस्वामी, मानद वन्यजीव रक्षक कौस्तुभ गावंडे, पीएफए, वर्धाचे डॉ. अक्षय गिरी यांच्यासह वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली भलावी, क्षेत्र सहाय्यक व्ही. एम. नरांजे, वनरक्षक के. डी. राठोड, माधव माने, अरुण गीते, पारस बडदे, वैशाली कोंडे आणि पूजा पूयेड यांनी सक्रिय सहभाग घेतला.

मानवी वस्ती आणि वन्यजीवांचा अधिवास यांच्यातील अंतर कमी होत असताना मानव-वन्यजीव संघर्षाचे प्रसंग वाढत आहेत. अशा परिस्थितीत वन्यजीवांचा जीव वाचवण्यासाठी तत्परता आणि संवेदनशीलता आवश्यक आहे. पुलगाव येथील या रेस्क्यू ऑपरेशनमधून वन विभाग आणि संबंधित यंत्रणांच्या समन्वयाचे सकारात्मक चित्र समोर आले.

जाळीत अडकलेल्या बिबट्याला पुन्हा मोकळे आकाश मिळाले; आणि एका वन्यजीवाचा जीव वाचविण्यात वन विभागाला यश आले.

 

Related to this topic: