Breaking News
  • तळकोकणात गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; गणपती बाप्पाचे वाजत गाजत आगमन
  • नाशिकच्या बागलाणमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
  • मयूर रथातून होणार दगडूशेठ गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक
  • नागपुरात अतिक्रमणधारकांविरोधात मनपा-पोलिसांची कठोर कारवाई
  • बुलडाण्यात आढळला स्वाइन फ्लूचा रुग्ण
  • मानाचा पहिला कसबा गणपती मंदिरासमोर ढोल वादन सुरू
  • गावा गावातून मराठा बांधव आक्रमक, मुंबईच्या दिशेने निघण्याची तयारी सुरू
  • रायगडमध्ये घरोघरी गणरायाच आगमन
  • बाप्पासाठी चांदीचा थाट! येवल्यात चांदीचे मोदक, फुलं अन् उंदीरमामांची क्रेझ

होम > देश

बांगलादेश हिंदू कुटुंब मृत्यू

छतावर वडील, जिन्यावर आई-मुलगी, पलंगाखाली मुलाचा मृतदेह!

Bangladesh Hindu Family Death: बांगलादेशातील रंगपूर शहरात एका हिंदू कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतांमध्ये निवृत्त शाळा शिक्षक


छतावर वडील जिन्यावर आई-मुलगी पलंगाखाली मुलाचा मृतदेह

Bangladesh Hindu Family Death |

 

बांगलादेशात हिंदू कुटुंबातील चौघांचा रहस्यमय मृत्यू

रंगपुर/बांग्लादेश (Bangladesh Hindu Family Death) : बांगलादेशातील रंगपूर शहरात एका हिंदू कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतांमध्ये निवृत्त शाळा शिक्षक, त्यांची पत्नी, 23 वर्षीय मुलगी आणि 12 वर्षीय मुलाचा समावेश आहे. रात्री दासपाडा परिसरातील बंद घरातून चौघांचे मृतदेह (Hindu Family Death) वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आले.

गुरुवारीपासून कुटुंबातील सर्व सदस्यांचे मोबाईल फोन बंद होते. बराच वेळ संपर्क न झाल्याने नातेवाईकांनी घर गाठले. घर बंद असल्याने संशय बळावला आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला असता (Hindu Family Death) चौघांचे मृतदेह आढळले.

चारही मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी

रंगपूर मेट्रोपॉलिटन CID अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, 65 वर्षीय गणपती चक्रवर्ती यांचा मृतदेह घराच्या छतावर आढळला. त्यांची पत्नी प्रीतिलता आणि 23 वर्षीय मुलगी आगमी यांचे मृतदेह जिन्याजवळ आढळले, तर 12 वर्षीय मुलगा प्रियमचा मृतदेह पलंगाखाली सापडला. मृतदेह अशा वेगवेगळ्या ठिकाणी आढळल्याने या (Hindu Family Death) प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे. चौघांचा मृत्यू नेमका कधी आणि कशामुळे झाला, तसेच त्यावेळी घरात नेमके काय घडले, याचा तपास सुरू आहे.

गुरुवारपासून मोबाईल बंद

नातेवाईकांच्या माहितीनुसार, प्रीतिलता चक्रवर्ती यांची बहीण पूजा चक्रवर्ती यांनी गुरुवारी दुपारी त्यांच्याशी शेवटचा संवाद साधला होता. त्यानंतर गुरुवारी रात्रीपासून कुटुंबातील चौघांचेही मोबाईल फोन बंद झाले. शनिवारी रात्रीपर्यंत कोणताही संपर्क न झाल्याने नातेवाईक दासपाडा येथील घरी पोहोचले. घराचा मुख्य दरवाजा बंद होता आणि घरातील दिवेही बंद होते. संशय आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

निवृत्त शिक्षक होते गणपती चक्रवर्ती

गणपती चक्रवर्ती हे रंगपूर जिल्हा शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. गेल्या वर्षी 31 डिसेंबर रोजी ते निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर ते होमिओपॅथीचे काम करत होते. (Hindu Family Death) कुटुंबाने दासपाडा परिसरात नवीन घर बांधले होते आणि तेथेच ते राहत होते. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, गणपती चक्रवर्ती यांचा कोणाशीही वाद किंवा वैर नव्हते. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाच्या मृत्यूमागचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मुलीने याच वर्षी पूर्ण केले होते पदव्युत्तर शिक्षण

गणपती चक्रवर्ती यांच्या कुटुंबात 50 वर्षीय पत्नी प्रीतिलता, 23 वर्षीय मुलगी आगमी चक्रवर्ती प्रार्थी आणि 12 वर्षीय मुलगा प्रियम होते. आगमीने याच वर्षी इंग्रजी विषयात पदव्युत्तर शिक्षण (मास्टर्स) पूर्ण केले होते. तर प्रियम रंगपूरमधील एका शाळेत पाचवीच्या वर्गात शिकत होता. कुटुंब सामान्य जीवन जगत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

पोलिसांसह CID आणि डिटेक्टिव्ह ब्रँचकडून तपास

या (Hindu Family Death) घटनेचा तपास स्थानिक पोलिसांसह CID आणि डिटेक्टिव्ह ब्रँचकडून केला जात आहे. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. चौघांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, त्यांच्या मृत्यूमध्ये कोणतीही बाहेरील व्यक्ती सहभागी होती का आणि घरात नेमके काय घडले, याचा तपास यंत्रणा करत आहेत. सध्या चौघांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसून, या रहस्यमय मृत्यूमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.