Breaking News
  • नाणेघाटावर धुक्याची पांढरी चादर; इंद्रवज्र पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
  • रांजणगाव गणपतीजवळ मिक्सर रोडखाली उतरला; वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
  • धुळे जिल्ह्यामध्ये असलेल्या एकूण 182 पेट्रोल पंपापैकी जवळपास 9 पेट्रोल पंपांवर डिझेलचा तुटवडा
  • फिसाळलेल्या कुत्र्याने एका सहा वर्षांच्या मुलासह आठ जणांचा चावा घेतल्याची घटना रायगडच्या कर्जतमधून समोर आली आहे
  • सांगोल्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
  • पंढरपूरमध्ये चालत्या एसटी बसची डिझेल टाकी तुटली; एसटी बसच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
  • बीडमध्ये केज तालुक्यातील जिवाचीवाडी शिवारात रात्री झालेल्या गारपिटीसह वादळी वाऱ्याने शेती पिकांचे नुकसान
  • पुण्यात किरकोळ कारणावरून तरुणावर कोयत्याने वार, २ जणांना अटक;पुण्यातील कोंढवा भागातील घटना सी सी टिव्ही मध्ये कैद
  • धाराशिवच्या उमरगा शहरात पावसाची जोरदार हजेरी,अचानक आलेल्या पावसामुळे आठवडी बाजाराचा उडाला फज्जा

होम > क्राईम जगत

वांगीमध्ये रेती उत्खनन

Sand Mining Case: डाकूपिंप्रीनंतर वांगी रेती धक्यावर मशिनीने रेतीचे उत्खनन

वांगी व डाकूपिंप्रीमध्ये नियमबाह्य रेती उत्खनन सुरू असून, स्थानिक प्रशासनाच्या संगनमतामुळे ग्रामस्थ नाराज. उपोषण व धरणे प्रदर्शन सुरू.


sand mining case डाकूपिंप्रीनंतर वांगी रेती धक्यावर मशिनीने रेतीचे उत्खनन

प्रशासनाला पुरावे पाहीजे असतील तर देशोन्नतीला संपर्क करा
महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष

परभणी (Sand Mining Case) : पाथरी तालुक्यातील डाकूपिंप्री व मानवत तालुक्यातील वांगी येथील रेतीच्या धक्यामध्ये थेट जेसीबी उतरुन रेतीचे रात्रंदिवस उत्खन्नन चालू आहे. रविवारी सकाळी वांगीच्या धक्यामध्ये जेसीबीच्या साह्याने रेतीचा उपसा केला जात असल्याचे थेट व्हीडीओ व फोटो देशोन्नतीच्या हाती लागले असून महसुल प्रशासन आणि गौण खनिज विभागातील अधिकार्‍यांचे यामध्ये संगनमत असल्याचे स्पष्ट दिसून येते.

परभणी जिल्ह्यात रेतीचे काही धक्के चालू करण्यात आले आहे. त्यामुळे विकास कामांना व इतर कामांना रेती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. परंतु या रेतीचे उत्खनन करण्यासाठी शासनाने एक नियमावली दिलेली आहे. जेसीबी मशिनने रेतीचे उत्खनन करता येत नाही. परंतु मागिल काही दिवसांपासून रेतीच्या धक्यामध्ये थेट जेसीबी मशिन उतरुन (Sand Mining Case) रेतीचे उत्खनन राजरोसपण केले जात आहे. मोठ मोठे हायवा भरुन देवून परिसरातील ग्रामीण रस्त्यांची चाळणी करण्याचे काम हे रेती तस्कर करत आहेत. तसेच अनेक गावातून ही वाहने जाताना ग्रामस्थाना देखील त्रास होत आहे. तेव्हा ग्रामस्थ वैतागले आहेत. पाथरी तालुक्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि एक तलाठी यांनी संगनमत करुन डाकूपिंप्रीचा धक्काच काहीजणांना सोबत घेवून चालविण्या-साठी घेतला आहे, अशी चर्चा आहे.

प्रभारी तलाठी याच्याकडून पैसा जमा करण्याचे काम महसुलमधील अधिकारी करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे डाकूपिंप्री या धक्यामध्ये दोन ते तीन मोठ्या जेसीबी उतरुन बेसुमार रेतीचे उत्खनन केले जात असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. काही ग्रामस्थांनी उपोषण देखील केले आहे. तरीही पाथरीचे महसुल अधिकारी झोपेचे सोंग घेताना दिसत आहेत. मानवत तालुक्यातील वांगी येथील रेतीच्या धक्यावर रविवारी सकाळी दोन मशिन धक्यामध्ये उतरुन रेतीचे उत्खनन केले गेले. मोठे हायवा लावून नियमबाह्य रेतीची वाहतूक केली गेली. सर्व नियम धाब्यावर बसवून वांगी येथील (Sand Mining Case) रेतीचा धक्का चालविला जात आहे. ताबडतोड डाकूपिंप्री व वांगी येथील दोनही धक्के जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी बंद करुन झालेल्या रेती उत्खननाचे पंचनामे करुन धक्का चालकाकडून दंड वसुल करावा अशी मागणी होत आहे.

Related to this topic: