Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > क्राईम जगत

हिंगोली अनोळखी पुरुष मृत्यू

हिंगोलीत अनोळखी इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

Hingoli Unknown Male Death: हिंगोलीत सावरकर नगरातील हनुमान मंदिराजवळ एक अनोळख्या पुरुष बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याला उपचारानंतर मृत्यू झाला. पोलिसांनी ओळख


हिंगोलीत अनोळखी इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

Hingoli Unknown Male Death |

हिंगोली (Hingoli Unknown Male Death) : शहरातील सावरकर नगर येथील हनुमान मंदिराजवळ 22 मे रोजी सकाळी 10 वाजून 21 मिनिटांनी एक अनोळखी पुरुष बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. स्थानिक नागरिकांनी याची माहिती देताच 108 रुग्णवाहिकेतून त्याला तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालय, हिंगोली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच 23 मे रोजी रात्री 12 वाजून 20 मिनिटांनी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात 24 मे रोजी आकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे. 

मयत इसमाचे वय अंदाजे 60 वर्षे असून वर्ण सावळा, बांधा सडपातळ व उंची 5 फूट 8 इंच आहे. त्याने काळ्या रंगाची स्पोर्टची हाफ चड्डी परिधान केली होती, ज्यावर दोन्ही बाजूंना लाल रंगाचे पट्टे आहेत. त्याच्या उजव्या हातात काळ्या रंगाचा बेल्ट होता. दोन्ही पायांच्या गुडघ्याखाली पांढऱ्या रंगाचे कोड असून डोक्याचे केस आणि दाढी काळी-पांढरी आहे. 
(Hingoli Unknown Male Death) सदर अनोळखी मयताची अद्याप ओळख पटलेली नाही. या इसमाबाबत कोणास काही माहिती असल्यास हिंगोली शहर पोलीस ठाणे 8669900678, पोलीस निरीक्षक संदीप मोदे 8108271166 किंवा तपासीक अंमलदार भिमराव चित्तारे 9850880856 या क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Related to this topic: