Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > क्राईम जगत

अवैध गॅससाठा

अवैध गॅससाठा व तंबाखू कारखाण्यावर नानलपेट पोलिसाचापोलीसांचा छापा

Illegal gas storage: परभणीमध्ये, पोलिसांनी अवैध गॅस साठा व तंबाखू कारखान्यावर छापा टाकून ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.


अवैध गॅससाठा व तंबाखू कारखाण्यावर नानलपेट पोलिसाचापोलीसांचा छापा 

Illegal gas storage |

३ लाखांचा मुद्देमाल जप्त; उस्मानिया कॉलनीत कारवाई

परभणी (Illegal gas storage) : शहरातील उस्मानिया कॉलनी परिसरात पोलिसांनी मध्यरात्री टाकलेल्या धाडीत अवैधरीत्या साठवलेले घरगुती गॅस सिलेंडर तसेच सुगंधी तंबाखू तयार करण्याचा कारखाना उघडकीस आला. या कारवाईत एकूण ३ लाख १३ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सय्यद जमाल सय्यद नबी याच्याविरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

घटने बाबत अधिक माहिती अशी की,  पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोनि  गणेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. या पथकात सपोनि   कारवार, पोनि बेंद्रे, नायब तहसिलदार दिपक नागरगोजे, दवंडे,इरफान,  जाधव, केंद्रे आदिंचा समावेश होता. दरम्यान रविवार २९ मार्च रोजी मध्यरात्री ३ वाजता पथक उस्मानिया कॉलनी येथे पोहोचले. आरोपी सय्यद जमाल सय्यद नबी   याच्या घरी तपासणी केली असता, घराच्या खालच्या मजल्यावर अवैधरित्या साठवलेले गॅस सिलेंडर व गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारी मशीन आढळली.

यामध्ये ३ भरलेले व ५ रिकामे गॅस सिलेंडर तसेच (Illegal gas storage) गॅस ट्रान्सफर करण्यासाठीची इलेक्ट्रिक मोटार व साहित्य असा सुमारे २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यानंतर घराच्या पहिल्या मजल्यावर तपासणी केली असता   सुगंधी तंबाखूचे पोते, कच्चा माल, केमिकल्स,पॅकिंग मशीन, वजनकाटा व इतर साहित्य असा एकूण २ लाख ९० हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल सापडला. या कारवाईदरम्यान अन्न सुरक्षा अधिकारी कृष्णा मुळे देखील उपस्थित होते.  या प्रकरणी  पोलीस नाईक संतोष पांडुरंग सानप  यांच्या  फिर्यादी वरुन सय्यद जमाल सय्यद नबी याच्याविरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान प्रशासनाच्या वतीने घरघुती गॅस सिलेंडरची (Illegal gas storage) चढ्या दराने विक्री करणार्‍यावर कारवाई करण्यासाठी काही पथके नियुक्त करण्यात आली आहे. याच पथकातील काही अधिकार्‍यांना उस्मानिया कॉलनित अवैध गॅस साठा असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे छापा टाकला असता  संबधीत ठिकाणी गॅससाठ्या सहित लाखो रुपयांचा अवैध गुटखा तयार करण्याचे साहित्य देखील मिळुन आले.

Related to this topic: