Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > क्राईम जगत

परभणी दागिने चोरी

कामाला आले अन् कामगारांनी घर साफ केले...

Parbhani jewelery stolen: परभणी शहरातील अजिजीया नगरमध्ये फरशी बसविण्याचे काम सुरू असताना ९७ हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने चोरीला गेले. कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


कामाला आले अन् कामगारांनी घर साफ केले

Parbhani jewelery stolen |

 

परभणी शहरातील अजिजीया नगरातील घटना कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...!

परभणी (Parbhani jewelery stolen) : शहरातील अजिजीया नगर परिसरात फरशी बसविण्याचे काम सुरू असताना घरातील कपाटातून ९७ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी घरात काम करणार्‍या फरशी कामगार व त्याच्या लेबरवर संशय व्यक्त करण्यात आला असून कोतवाली पोलिस ठाण्यात गुरुवार ७ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी शहनाजबी शेख एजाज यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या घरात फरशी बसविण्याचे काम सुरू होते. हे काम शफीक शेख जाफर याच्याकडे देण्यात आले होते. रविवार ३ मे रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी, त्यांचे पती, मुलगा व मुलगी कामानिमित्त बाहेर गेले होते. घरात फिर्यादीची सासू व मुलगा होते. दरम्यान, शफीक शेख जाफर व त्याचा लेबर मुज्जु अलीम हे घरात फरशीचे काम करीत होते. सायंकाळी ६ वाजता कुटुंबीय घरी परतल्यानंतर मुलीच्या लग्नासाठी विकत घेतलेले सोन्या-चांदीचे दागिने कपाटातून गायब असल्याचे निदर्शनास आले.

कपाटाची चावी वापरून (Parbhani jewelery stolen) दागिने चोरल्यानंतर कपाट पुन्हा जशास तसे ठेवण्यात आल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये सोन्याचे गलसर, पोत व मणि, कानातील झुंबर तसेच चांदीची चैन असा एकूण ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी शफीक शेख जाफर व त्याचा लेबर मुज्जु अलीम यांच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Related to this topic: