Breaking News
  • माजलगावात अल्पवयीन विवाहितेचा नियमबाह्य गर्भपात? अतिरक्तस्रावानंतर तरुणी बेपत्ता
  • लातूर तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर 17 जण जखमी
  • वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू
  • सलग पाचव्या दिवशी भंडाऱ्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी
  • फसव्या कर्जमाफीविरोधात रविकांत तुपकरांचा एल्गार; उद्यापासून अन्नत्याग आंदोलन
  • FSSAI कंपनीची मोठी कारवाई, ८ फूड कंपन्याना पाठवली नोटीस
  • अण्णा हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा
  • पेरणीची घाई करू नका; दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते : मेघना बोर्डीकर
  • नांदेड जिल्ह्यात पाऊस वादळीवारासह पावसाची हजेरी

होम > क्राईम जगत

परभणी वाळु उपसा

परभणीत किनी, ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळुचा उपसा

Parbhani Sand Upasa: सोनपेठ तालुक्यातील लोहिग्राम शिवारात गोदावरी नदीपात्रातून किनी मशीन आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने अवैधरित्या वाळुचा उपसा सुरू होता. मंगळवार २६ मे रोजी सोनपेठ पोलिस


परभणीत किनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळुचा उपसा

Parbhani Sand Upasa |

 

सोनपेठ तालुक्यातील लोहिग्राम गोदापात्रात पोलिसांचा छापा

परभणी (Parbhani Sand Upasa) : सोनपेठ तालुक्यातील लोहिग्राम शिवारात गोदावरी नदीपात्रातून किनी मशीन आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने अवैधरित्या वाळुचा उपसा सुरू होता. मंगळवार २६ मे रोजी सोनपेठ पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकत वाळू उपशाचे साहित्य व इतर वस्तू मिळून २ लाख ११ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

गोपनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीवरुन पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शिरतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. गिते, पोलीस अंमलदार पुंडलिक वंजारे, राजेश कांबळे, भागवत हुंडेकर, अमृत देवकते, शिंदे, महसूल अधिकारी बालाजी नागदे, शाहुराज दिक्षित यांच्या पथकाने कारवाई केली. पोलिसांना पाहून वाळू उपसा करणारे काहीजण पसार झाले.  अजय बालाजी आडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

चौकशी दरम्यान त्याने पांडुरंग ढाकणे यांच्या सांगण्यावरुन किनीच्या सहाय्याने नदीपात्रातून अवैध वाळू उपसा (Parbhani Sand Upasa) सुरू असल्याची माहिती दिली. या कारवाईत टोपले, खोरे, वायर रोप, वाळू उपशासाठी लागणारे साहित्य, ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. सदर कारवाईत अजय आडे, रामेश्वर राठोड, बन्सीराम राठोड, मुंजा हिक्के, पांडुरंग ढाकणे यांच्यावर सोनपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.