Breaking News
  • राम चरणच्या वाढदिवशी चाहत्यांना सरप्राईज; ‘पेड्डी’चा दमदार टीझर प्रदर्शित
  • सावधान!!...नाहीतर देशात लॉकडाऊन लागू होणार?
  • आयपीएल 2026: 'या' 5 दिग्गज खेळाडूंना 'जीरो से हीरो' बनण्याची संधी!
  • आयपीएल 2026: संपूर्ण वेळापत्रक जाहीर, पहिल्याच दिवशी RCB Vs हैदराबाद
  • नेपाळचे नवे पंतप्रधान: बालेन्द्र शाह आज शपथबद्ध
  • डिजिटल मोबाईल अँपच्या माध्यमातून होणार 2027 ची जनगणना
  • महाराष्ट्राचे इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन
  • आता दुचाकीसाठी मिळणार फक्त 200 रुपयांचे पेट्रोल
  • नोरा फतेहीच्या 'सरके चुनरिया' या गाण्याविरोधात सरकारची मोठी कारवाई

होम > क्राईम जगत

मानवत अट्टल गुन्हेगार

परभणीच्या मानवत तालुक्यातील तीन अट्टल गुन्हेगार हद्दपार

Manvat Inveterate Criminal: परभणीच्या मानवत तालुक्यात गंभीर गुन्ह्यातील तीन अट्टल गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले, ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढली.


परभणीच्या मानवत तालुक्यातील तीन अट्टल गुन्हेगार हद्दपार

Manvat Inveterate Criminal |

गंभीर स्वरुपाचे गुन्हे होते दाखल दाखल
पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांची कारवाई

मानवत (Manvat Inveterate Criminal) : शहरासह तालुक्यात गुन्हेगारीचा उच्छाद मांडणार्‍या व गंभीर स्वरुपाचे अनेक गुन्हे दाखल असलेल्या तीन गुन्हेगारांना परभणी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक रिंवद्रसिंह परदेशी यांनी याबाबतचे आदेश २५ मार्च रोजी काढले आहेत.

मागील काही काळात मानवत शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात (Manvat Inveterate Criminal) गुन्हेगारी टोळ्यांनी हैदास मांडला होता. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांत भितीचे वातावरण पसरले होते. गुन्हेगारांचा बिमोड करण्याची मागणी जोर धरत होती. मानवत शहरात पवनिंसग गब्बूसिंग बावरी रा. एकता  नगर याच्या टोळीने धुमाकूळ घातला होता. शहरातील एकता नगर, पेठमोहल्ला, पाळोदी रोड, स्मशान भूमीलगत, गरुड पुतळा, आंबेगाव पाटी, फुले नगर इत्यादी भागात गुन्हेगारी वाढली होती. मनुष्यवध, सरकारी नोकरादास  धमकावणे, दुखापत करणे, दंगा करणे, प्राणघातक हत्यारानिशी सज्ज होऊन दंगा करणे, सार्वजनिक शांतता भंगकरणे आदी स्वरुपाचे गंभीर गुन्ह्यात पवनिंसंग बावरी आणि त्याच्या टोळीचा सहभाग होता.

या टोळीव मानवत पोलिस ठाण्यात (Manvat Inveterate Criminal) अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले होते. पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्याकडे पवनसिंग बावरी, दिपसिंग बावरी, शामसिंग जुन्नी सर्व रा. एकता नगर ता. मानवत यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सर्व गुन्हेगारांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यांना सुधारण्याची संधी सुध्दा देण्यात आली होती. मात्र त्यांच्यात कोणतीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी महाराष्ट्र राज्य पोलिस कायदा, १९५१ च्या कलम ५५ मधील तरतुदीनुसार टोळीप्रमुख पवनसिंह बावरी, दिपसिंग बावरी, शामसिंग बावरी यांच्याविरुध्द परभणी जिल्ह्यातून सहा महिन्यापासून हद्दपारीची कारवाई करण्यात येत असल्याचे आदेश दिले आहेत. मात्र शामसिंग बावरी विरुध्द आजपावेतो एकच गुन्हा दाखल असल्याने त्याच्याकडून ५० हजार रुपयांचे बंधपत्र करुन घेण्यात आले आहे. त्याला दर महिन्याला दुसर्‍या व चौथ्या सोमवारी मानवत पोलिस ठाण्यात हजेरी द्यावी लागणार आहे. 

त्याच बरोबर तालुक्यातील श्रावण अण्णा काळे रा.तामसवाडी, पांडू गुलाब काळे रा. मंगरुळ, संतोष सचिन पवार, रा. मंगरुळ, विशाल अमरसिंह ठाकूर रा. मंगरुळ यांच्यावरही गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यापैकी टोळीप्रमुख श्रावण काळे यास तीन महिन्यासाठी परभणी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. पोलिस अधिक्षकांच्या या कारवाईचे सर्व सामान्य नागरीकांतून स्वागत होत आहे. त्याच बरोबर गुन्हेगारात जरब बसली आहे.

Related to this topic: