Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > क्राईम जगत

कार आणि ट्रकची धडक

भरधाव कार-हायवाची समोरा-समोर धडक; चालक ठार

Car-Truck Accident: महाराष्ट्रातील हट्टा येथे कार आणि हायवा ट्रकची समोरासमोर धडक झाली, ज्यामध्ये कार चालकाचा मृत्यू झाला आणि ट्रक चालक फरार झाला.


भरधाव कार-हायवाची समोरा-समोर धडक चालक ठार

Car-Truck Accident |

हट्टा (Car-Truck Accident) : वसमत तालुक्यातील हट्टा येथून जवळच असलेल्या  झिरो  फाटा  ते वसमत रस्त्यावरील वर्मा पेट्रोल पंपाजवळ  भरधाव  कार  व हायवाची समोरा  समोर धडक  झाल्याने चालक  ठार  झाल्याची घटना २९ मार्च रविवार रोजी  दुपारी  २ वाजता घडली.  

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार,  झिरो  फाटा ते वसमत रस्त्यावर वर्मा पेट्रोल पंपाच्या (Car-Truck Accident) जवळ नांदेडू येथून परभणी कडे जाणारी कार क्रमांक एम.एच.२६ सी.ई. २३६९ व परभणीकडून वसमतकडे जाणारा हायवा ट्रक क्रमांक एम.एच. २६ एच.५५२६ हा विट भट्ट्यासाठी माती घेवून जाणारा ट्रक यांच्यात दुपारी २ वाजता अपघात झाला. यात कार चालकाचा जागील मृत्यू झाला. यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान  झाले. चालक कारमध्ये अडकला. त्याला बाहेर काढण्यासाठी  नागरीकांनी मोठे प्रयत्न मात्र  ते निष्फळ ठरले. यामध्ये कार चालकाचा मृत्यू झाला.

तर (Car-Truck Accident) कार चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात हायवा देखील  पलटी झाला. अपघाताच ट्रक चालक घटनास्थळा वरून फरार झाला. घटनास्थळी हट्टा  पोलिस  ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, तांम्रध्वज कासले,कवठेकर, गवळी आदींनी भेट देवून रस्त्यावरील वाहतुक सुरळीत केली.मयताचे नाव मात्र कळू शकले नाही.

Related to this topic: