Breaking News
  • वर्धा नदीत पाच मुले बुडाली, एकाचा मृतदेह सापडला
  • पुणे विषारी दारू प्रकरण: राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.

होम > क्राईम जगत

हिंगोली अवैध दारू विक्री

हिंगोली पोलिसांचा अवैध दारू विक्रीवर कठोर प्रहार : एकाच वेळी छापेमारीत 28 गुन्हे दाखल

Hingoli Illegal Liquor Sale: जिल्ह्यातील अवैध दारू विक्रीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी हिंगोली पोलिसांनी मंगळवारी मोठी कारवाई केली. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्यात


हिंगोली पोलिसांचा अवैध दारू विक्रीवर कठोर प्रहार  एकाच वेळी छापेमारीत 28 गुन्हे दाखल

Hingoli Illegal Liquor Sale |

हिंगोली (Hingoli Illegal Liquor Sale) : जिल्ह्यातील अवैध दारू विक्रीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी हिंगोली पोलिसांनी मंगळवारी मोठी कारवाई केली. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी अचानक छापेमारी करण्यात आली. या धडक कारवाईत तब्बल 28 जणांविरोधात अवैध दारू विक्री प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी अवैध धंद्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरल्या आहेत. अवैध धंदेवाले पोलिसांच्या कारवाईचा सुगावा घेऊन सतर्क राहतात. त्यामुळे यावेळी डॉ. रोहन यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता सर्व ठाणेदारांना थेट आदेश दिले आणि पूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी अवैध दारू अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले.

या (Hingoli Illegal Liquor Sale) कारवाईत सर्व पोलीस ठाण्याचे ठाणेदार, उपविभागीय पोलीस अधिकारी पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सहभागी झाले होते. पोलिसांच्या कार्यवाहीचा कोणताही सुगावा न लागता अचानक पडलेल्या छाप्यांमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे कंबरडे मोडले आहे. पोलिसांच्या लगातार छापेमारी आणि मुद्देमाल जप्तीमुळे उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त होत असल्याने अनेक दारू विक्रेत्यांनी गाशा गुंडाळल्याचे समोर येत आहे.

ही (Hingoli Illegal Liquor Sale) संपूर्ण मोहीम पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी वसमत राजकुमार केंद्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगोली शहर कुंदन कुमार वाघमारे आणि प्र. पोलीस उप अधीक्षक मयूर रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली. जिल्ह्यातील सर्व ठाणेदार तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी ही कारवाई यशस्वी केली. पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार यानंतरही अवैध दारू विक्री विरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. जिल्ह्यात कुठेही अवैध दारू विक्री खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध दारू विक्रीला मोठ्या प्रमाणात आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.