Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > क्राईम जगत

वसमत लाच प्रकरण

पुर्णा पाटबंधारे विभागातील वरिष्ठ लिपीक १ हजाराची लाच घेताना चतुर्भुज

Wasmat Bribery Case: वरिष्ठ लिपीक सलिम अब्दुल अहमद शेख याला वसमत येथे लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले, त्यावर गुन्हा दाखल केला गेला.


पुर्णा पाटबंधारे विभागातील वरिष्ठ लिपीक १ हजाराची लाच घेताना चतुर्भुज

Wasmat Bribery Case |

हिंगोली (Wasmat Bribery Case) : पुर्णा पाटबंधारे विभागातील एका कर्मचार्‍याच्या वेतनाचे देयके तयार करून त्यावर उपकार्यकारी अभियंता (आस्थापना) यांची स्वाक्षरी घेऊन कोषागार विभागात जमा केल्याने त्या बदल्यात 1 हजार रुपयाच्या लाचेची मागणी करून स्विकारताना वरिष्ठ लिपीकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने  सोमवारी रात्रीच्या सुमारास वरिष्ठ लिपीकास चतुर्भूज केले. 

याबाबत (Wasmat Bribery Case) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दिलेली माहिती अशी की, पुर्णा पाटबंधारे विभाग वसमत या कार्यालयातील एका कर्मचार्‍याचे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 2025 या तीन महिन्याचे देयके तयार करून त्यावर उपकार्यकारी अभियंता आस्थापना यांची स्वाक्षरी घेऊन ते कोषागार विभागात जमा केल्याबाबतचा मोबदला म्हणुन पुर्णा पाटबंधारे विभाग वसमत येथील वरिष्ठ लिपीक सलिम अब्दुल अहमद शेख यांनी 1 हजाराच्या लाचेची मागणी कर्मचार्‍याकडे केली होती.

या संदर्भात त्यांनी (Wasmat Bribery Case) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली होती. त्याची पडताळणी 23 मार्चला करण्यात आली असता देयके कोषागारात जमा केल्यानंतर त्याच्या मोबदल्यात 1 हजार रुपये स्वत: स्विकारणार असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून 23 मार्चला पुर्णा पाटबंधारे विभाग वसमत येथील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला असता 1 हजार रुपयाची लाच स्विकारताना पुर्णा पाटबंधारे विभागातील वरिष्ठ लिपीक सलिम अब्दुल अहमद शेख याला पथकाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणात वसमत शहर पोलिसात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 

ही (Wasmat Bribery Case) कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक संदिप पालवे, अप्पर पोलिस अधिक्षक अशोक कदम, हिंगोली पोलिस उपाधिक्षक विकास घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीमती सुलभा राऊत, पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू, गजानन पवार, गोविंद शिंदे, अमोल जाधव, विनोद पुंडगे, चालक पोलिस हवालदार शेख अकबर यांच्या पथकाने केली आहे.

Related to this topic: