Parbhani-Vasmat accident: परभणी-वसमत रोडवर भीषण अपघातात चारचाकीतील एक व्यक्तीचा मृत्यू. ट्रक आणि कारची समोरासमोर धडक झाली.
परभणी (Parbhani-Vasmat accident) : झिरो फाटा परभणी-वसमत मार्गावरील झिरो फाटा जवळ ट्रक आणि चारचाकी कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात चारचाकी कारमधील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवार २९ मार्च रोजी दुपारी २.३० च्या सुमारास घडला. मृत व्यक्तीचे नाव श्रीराम विठ्ठलराव भिसे (रा. शिवदत्त नगर, नांदेड) असे असून ते वसमत कडून परभणी कडे च्या दिशेने प्रवास करत होते. दरम्यान, (Parbhani-Vasmat accident) वसमत कडुन परभणीकडे येणार्या चारचाकी कार क्रमांक क्र. एमएच २६ सीई २३६९ आणि समोरून येणारा ट्रक क्र. एमएच २६ एच ५५२६ यांची समोरासमोर धडक झाली आहे धडक झाली.
धडक अत्यंत भीषण असल्याने चारचाकी कारचे मोठे नुकसान झाले असून कारमधील श्रीराम विठ्ठलराव भिसे यांचा जागीच मृत्यू झाला. (Parbhani-Vasmat accident) अपघाता-ची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पूर्णा विलास गोबाडे, पोलीस उपनिरीक्षक एस. एस. पडलवाड, पोलीस शिपाई सुधीर काळे तसेच एरंडेश्वर येथील पोलीस पाटील बापूराव राऊत यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा व मदतकार्य सुरू केले. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत पुढील तपास सुरू केला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.