Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > क्राईम जगत

वसमत एटीएम फसवणूक

एटीएम ची अदलाबदली करून 41 हजार रुपये लांबवले

Wasmat ATM Fraud: वसमतमध्ये एटीएमची अदलाबदल करून एक अज्ञात व्यक्तीने 41,200 रुपये लांबवले. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.


एटीएम ची अदलाबदली करून 41 हजार रुपये लांबवले

Wasmat ATM Fraud |

वसमत येथे गुन्हा दाखल

वसमत (Wasmat ATM Fraud) : एटीएम मधून पैसे काढून देतो म्हणून हात चलाखीने एटीएमची अदलाबदली केली व एटीएम वापरून 41 हजार दोनशे रुपये परस्पर काढून घेऊन फसवणूक करण्यात आल्याने अज्ञात व्यक्ती विरोधात वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत वसमत शहरातील देशपांडे पेट्रोल पंप परिसरात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया च्या एटीएम वर वैजनाथ आमलगोंडे हे 9 मार्च रोजी गेले होते एटीएम द्वारे पैसे काढताना तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने त्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला एटीएम मधून पैसे काढून देतो असे म्हणून त्याने प्रयत्न करताना एटीएमची अदलाबदली केली बनावट एटीएम आमलगोंडे यांच्याकडे बदललेले एटीएम देऊन पैसे निघत नाहीत असे सांगून तो व्यक्ती निघून गेला.

काही वेळाने आमलगोंडे यांच्या बँक खात्यातून (Wasmat ATM Fraud) रक्कम कमी झाल्याचे मेसेज येणे सुरू झाले एकूण 41 हजार दोनशे रुपये एटीएम द्वारे काढण्यात  आले आहेत. बँकेत जाऊन चौकशी केली असता एटीएम च्या माध्यमातून पैसे काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले संबंधित अनोळखी व्यक्तीने पैसे काढण्याच्या नावाखाली पासवर्ड चलाखीने माहिती करून घेतला आणि एटीएम बदलून निघून गेला आपली फसवणूक झाली हे लक्षात आल्यानंतर 29 मार्च  रोजी  वैजनाथ हरीभाऊ आमलगोंडे,रा. आसेगाव यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 प्रकरणाचा तपास वसमत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेख नय्यर , इमरान कादरी, अजय पंडित करत आहेत सीसीटीव्ही च्या माध्यमातून आरोपीचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे

Related to this topic: