मोफत आरोग्य शिबिर

​गंभीर आजारांच्या शस्त्रक्रिया होणार मोफत; आ. भावनाताई गवळी यांची माहिती

Free Health Camp: रिसोडमध्ये महिला उत्कर्ष प्रतिष्ठान व आयुर्वेद महाविद्यालयाच्या संयुक्त उपक्रमाने भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले गेले

​गंभीर आजारांच्या शस्त्रक्रिया होणार मोफत; आ. भावनाताई गवळी यांची माहिती

MLA Bhavna Gawli

 

महिला उत्कर्ष प्रतिष्ठान व आयुर्वेद महाविद्यालय मध्ये भव्य मोफत आरोग्य शिबिराचा शुभारंभ

पहिल्याच दिवशी ९१६ रुग्णांची तपासणी!

​रिसोड (Free Health Camp) : रिसोड जवळील पुंडलिक नगर (देगाव) येथे महिला उत्कर्ष प्रतिष्ठान व आयुर्वेद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य मोफत रोगनिदान व आयुर्वेद पंचकर्म शिबिराला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. शिबिराच्या पहिल्याच दिवशी तब्बल ९१६ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली असून गरजू रुग्णांना औषधी व चष्म्यांचे मोफत वाटप करण्यात आले.

​या (Free Health Camp) शिबिराचे मुख्य आकर्षण म्हणजे सर्वसामान्यांना न परवडणाऱ्या वैद्यकीय सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. साधारणपणे ५००० रुपये खर्च येणाऱ्या रक्ताच्या सर्व चाचण्या येथे विनामूल्य केल्या जात आहेत. तसेच, तपासणीनंतर ज्या रुग्णांना गंभीर आजार असल्याचे निदान होईल, त्यांच्यावर मुंबई, पुणे, संभाजीनगर येथील मोठ्या रुग्णालयांमध्ये मोफत शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.

​शिबिरात नेत्र तपासणी, हाडांची तपासणी, हृदयरोग, सांधेदुखी, कंबरदुखी, आम्लपित्त, बद्धकोष्ठता, मधुमेह, लठ्ठपणा, थायरॉईड आणि जुन्या डोकेदुखीवर तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन व उपचार केले. आयुर्वेद पंचकर्म विभागालाही रुग्णांनी मोठी पसंती दिली. तसेच स्त्री-रोग विभागांतर्गत गर्भाशयाचे आजार व पोटाच्या विकारांची सखोल तपासणी करण्यात आली.
​या (Free Health Camp) शिबिराप्रसंगी आमदार भावनाताई गवळी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल कावरखे, डॉ. कड, जिल्हा शिवसेना सचिव नागेश घोपे, जिल्हा संघटक अनिल गरकल, बाजार समिती सभापती विष्णुपंत भुतेकर, उपसभापती ॲड. गजानन अवताडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष सतीश मांदळे, नगर परिषद उपाध्यक्ष विष्णू कदम यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक आणि शिवसैनिक उपस्थित होते. तपासणीनंतर ज्या रुग्णांना गंभीर आजार असल्याचे निदान होईल, त्यांच्यावर मुंबई, पुणे, संभाजीनगर येथील मोठ्या रुग्णालयांमध्ये मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे ​"हे शिबिर १५ तारखेपर्यंत सुरू राहणार असून, गोरगरीब व गरजू रुग्णांनी एकाच छताखाली मिळणाऱ्या या आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा."
-आमदार भावनाताई गवळी (अध्यक्षा, महिला उत्कर्ष प्रतिष्ठान)

संबंधित सामग्री

रिसोड तहसील कार्यालयाचा उपक्रम: महसूल लोक अदालतीतून ८ शेतरस्त्यांचे वाद सामंजस्याने निकाली

रिसोड तहसील कार्यालयाचा उपक्रम: महसूल लोक अदालतीतून ८ शेतरस्त्यांचे वाद सामंजस्याने निकाली

Risod Revenue Lok Adalat: शेतात ये-जा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या शेतरस्त्यांचे प्रलंबित वाद 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियाना'अंतर्गत रिसोड तहसील कार्यालयात सामंजस्य

Oct 06, 2026
रिसोड तालुक्यात दुष्काळी सावटाखाली पीक पंचनामे युद्धपातळीवर सुरू

रिसोड तालुक्यात दुष्काळी सावटाखाली पीक पंचनामे युद्धपातळीवर सुरू

Risod Taluka Drought: यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे रिसोड तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, महसूल प्रशासनाने नुकसानीच्या पीक पंचनाम्यांना गती दिली आहे.

Oct 05, 2026
उन्हाच्या तीव्रतेसोबतच रिसोड तालुक्यात पाणीटंचाईचे सावट; पळसखेड प्रकल्पात केवळ ४.०८ टक्के साठा

उन्हाच्या तीव्रतेसोबतच रिसोड तालुक्यात पाणीटंचाईचे सावट; पळसखेड प्रकल्पात केवळ ४.०८ टक्के साठा

Risod Taluka Water Scarcity: उन्हाचा पारा दिवसागणिक वाढत चालल्याने रिसोड तालुक्यातील जलसाठ्यांची स्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. वाढत्या तापमानामुळे आगामी काळात तीव्र पाणीटंचाईचे स्पष्ट संकेत

Oct 04, 2026
आसोला ग्रामस्थांना दोन विद्युत रोहित्र उपलब्ध; आमदार भावनाताई गवळी यांच्या प्रयत्नांना यश

आसोला ग्रामस्थांना दोन विद्युत रोहित्र उपलब्ध; आमदार भावनाताई गवळी यांच्या प्रयत्नांना यश

आसोला गावातील चार महिन्यांपासून जळालेले दोन विद्युत रोहित्र आमदार भावनाताई गवळी यांच्या प्रयत्नांतून उपलब्ध झाले. त्यामुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

Sep 27, 2026
भरधाव रेतीचा टिप्पर पलटी; चालक जखमी

भरधाव रेतीचा टिप्पर पलटी; चालक जखमी

Risod sand tipper accident: रिसोड–लोणी मार्गावर गुरुवारी, दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास नवीन वन उद्यानाजवळ भरधाव रेती वाहतूक करणारा टिप्पर पलटी झाल्याची घटना घडली.

Sep 24, 2026