रिसोड रेती टिप्पर अपघात

भरधाव रेतीचा टिप्पर पलटी; चालक जखमी

Risod sand tipper accident: रिसोड–लोणी मार्गावर गुरुवारी, दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास नवीन वन उद्यानाजवळ भरधाव रेती वाहतूक करणारा टिप्पर पलटी झाल्याची घटना घडली.

भरधाव रेतीचा टिप्पर पलटी; चालक जखमी

Risod sand tipper accident

 

रिसोड–लोणी मार्गावरील नवीन वन उद्यानाजवळ अपघात
महावितरणच्या विद्युत खांबांसह तारांचे मोठे नुकसान

रिसोड (Risod sand tipper accident) : रिसोड–लोणी मार्गावर गुरुवारी, दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास नवीन वन उद्यानाजवळ भरधाव रेती वाहतूक करणारा टिप्पर पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात टिप्पर चालक जखमी झाला असून, पलटी झालेल्या टिप्परमुळे महावितरणच्या विद्युत खांबांसह विद्युत तारांचे मोठे नुकसान झाले.मिळालेल्या माहितीनुसार, रेती वाहतूक करणारा टिप्पर भरधाव वेगाने रिसोडच्या दिशेने जात असताना नवीन वन उद्यानाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टिप्पर पलटी झाला.

या (Risod sand tipper accident) दरम्यान वाहनाची धडक महावितरणच्या विद्युत खांबाला बसल्याने खांब व तारा क्षतिग्रस्त झाल्या.अपघातामुळे परिसरात काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. विशेषतः या मार्गावरून मोठ्या प्रमाणात नागरिक व वाहनांची ये-जा सुरू असते. भरधाव वेगाने धावणाऱ्या रेतीच्या टिप्परमुळे भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परच्या वेगावर नियंत्रण ठेवून संबंधित वाहनांवर आवश्यक ती कारवाई करावी, तसेच या मार्गावर वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

काही वेळानंतर सदर टिप्पर हा जेसीबीच्या साह्याने सरळ करण्यात आले यावेळी या ठिकाणी नागरिकांची गर्दी जमली होती रिसोड लोणार या मार्गावर अन्य जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक होत असते. या रस्त्यावर टिपऱ्यांची संख्या अधिकच आहे. मात्र यातच सदर टिप्पर चालक इतक्या भरधाव वेगाने टिप्पर चालवत असतात की अन्य वाहनधारक दुचाकी धारक किंवा पादचारी अक्षरशा भयभीत होत असतात. रिसोड शहर व तालुक्यात भरधाव टिप्पर पलटी होण्याच्या घटना मध्ये वाढ होत चाललेली आहे. जरी यामध्ये कोणत्या प्रकारची जीवित हानी झाली नसली तरी मात्र येणाऱ्या काळात टिप्पर वरील वेगावर नियंत्रण न मिळवल्यास एक मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर रेती चा परवाना वैद्य असल्याचे महसूल विभागाने सांगितले आहे.