रिसोड तालुका दुष्काळ

रिसोड तालुक्यात दुष्काळी सावटाखाली पीक पंचनामे युद्धपातळीवर सुरू

Risod Taluka Drought: यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे रिसोड तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, महसूल प्रशासनाने नुकसानीच्या पीक पंचनाम्यांना गती दिली आहे.

रिसोड तालुक्यात दुष्काळी सावटाखाली पीक पंचनामे युद्धपातळीवर सुरू

Risod Taluka Drought

 

​आतापर्यंत १७ हजार ८३६ शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण;
केनवड मंडळ आघाडीवर, मोपमध्ये सर्वात कमी प्रगती

रिसोड (Risod Taluka Drought) : यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे रिसोड तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, महसूल प्रशासनाने नुकसानीच्या पीक पंचनाम्यांना गती दिली आहे. तहसील कार्यालयाच्या अधिकृत अहवालानुसार, तालुक्यातील ५७ हजार ८६३ शेतकऱ्यांपैकी ४ ऑक्टोबरपर्यंत १७ हजार ८३६ शेतकऱ्यांच्या शेतातील पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. एकूण ७९ हजार २१३.२८ हेक्टर क्षेत्रापैकी २४ हजार ८१२.७९ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे झाले असून, हे प्रमाण ३१.३२ टक्के इतके आहे.

​तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने उभ्या पिकांची नासाडी झाली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. परिणामी (Risod Taluka Drought) रिसोड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आला आहे. दरम्यान, शासनाने 'ट्रिगर १' लागू करून पंचनाम्यांचे आदेश दिल्यानंतर जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या निर्देशानुसार महसूल विभागाने तालुक्यातील सर्व मंडळांमध्ये सरसकट पंचनाम्याचे काम हाती घेतले आहे. जिल्हा प्रशासनाने हे काम अधिक वेगाने पूर्ण करण्याचे सक्त निर्देश यंत्रणेला दिले आहेत.

​मंडळनिहाय पंचनाम्यांची टक्केवारी:

​केनवड: ३९.४८% (तालुक्यात आघाडीवर)
​गोवर्धन: ३८.१०%
​वाकद: ३६.०९%
​भर जहागीर: ३४.०६%
​रिसोड: ३२.८७%
​रिठद: २८.३९%
​कवठा खुर्द: २७.९६%
​मोप: १६.७२% (तालुक्यात सर्वात कमी)

​शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान लक्षात घेता उर्वरित पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून नुकसानभरपाईचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी आता शेतकरी वर्गातून केली जात आहे.

टैग्स: Risod Taluka Drought

संबंधित सामग्री

रिसोड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; आमदार अमित झनक यांच्या नेतृत्वाखाली शासनाला निवेदन

रिसोड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; आमदार अमित झनक यांच्या नेतृत्वाखाली शासनाला निवेदन

Risod Taluka drought: रिसोड तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने खरीप हंगामातील पिकांवर मोठे संकट ओढवले आहे. पावसाअभावी अनेक भागांतील पिके करपण्याच्या मार्गावर असून

Sep 08, 2026
रिसोड तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती; शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची वंचित ची मागणी

रिसोड तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती; शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची वंचित ची मागणी

Risod Taluka Drought: यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने गंभीर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असून शेतकरी आर्थिक संकटात

Sep 07, 2026