रिसोड तालुका दुष्काळ

रिसोड तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती; शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची वंचित ची मागणी

Risod Taluka Drought: यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने गंभीर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असून शेतकरी आर्थिक संकटात

रिसोड तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती; शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची वंचित ची मागणी

Risod Taluka Drought

रिसोड (Risod Taluka Drought) : रिसोड तालुक्यात यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने गंभीर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत व दुष्काळी सवलती जाहीर कराव्यात, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे रिसोड तालुकाध्यक्ष महेश विठ्ठल तिडके यांनी केली आहे.

या संदर्भात तहसीलदार, रिसोड यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, रिसोड तालुक्यातील अनेक भागांमध्ये अपेक्षित पाऊस न झाल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी बियाणे, खते, औषधे व मशागतीवर मोठा खर्च केला असून पावसाअभावी उत्पादन घटण्याची भीती निर्माण झाली आहे.
निवेदनाद्वारे प्रशासनाकडे पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
रिसोड तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचे तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करावेत.
पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी.
पीक विम्याची नुकसानभरपाई तातडीने मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी.
दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून शेतकऱ्यांना कर्जमाफी व व्याजमाफीसह सवलती द्याव्यात.
ग्रामीण भागातील रोजगाराची समस्या लक्षात घेऊन मनरेगा व इतर शासकीय योजनांतून रोजगार उपलब्ध करून द्यावा.
पुढील हंगामासाठी बियाणे, खते व कृषी निविष्ठांवर विशेष अनुदान द्यावे.
प्रशासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेतकरी व नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही महेश विठ्ठल तिडके, तालुकाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, रिसोड यांनी दिला आहे

निवेदनावर सह्या  प्रा.रंगनाथ धांडे जिल्हा सरचिटणीस वं.ब.आ. प्रा.शालिग्राम  पठाडे जिल्हाउपाध्यक्ष भा.बौ.म.स.  गिरीधर  शेजुळ, संध्याताई पंडित, माधव हिवाळे,  तालुकाध्यक्ष, प्रमिलाताई  शेवाळे, मंदाताई  धांडे, मंदाताई  वाघमारे, सदानंद गायकवाड, प्रकाश गवई, गुलाब मस्के, कैलास  धांडे, गजाजन  खंडारे, देवानंद  मोरे, विनोद घुगे, साहेबराव  नवघरे,  मिनाताई चव्हाण, कैलास  पंडित, कैलास  जुमडे, संतोष अल्हाट आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टैग्स: Risod Taluka Drought

संबंधित सामग्री

रिसोड तालुक्यात दुष्काळी सावटाखाली पीक पंचनामे युद्धपातळीवर सुरू

रिसोड तालुक्यात दुष्काळी सावटाखाली पीक पंचनामे युद्धपातळीवर सुरू

Risod Taluka Drought: यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे रिसोड तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, महसूल प्रशासनाने नुकसानीच्या पीक पंचनाम्यांना गती दिली आहे.

Oct 05, 2026
रिसोड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; आमदार अमित झनक यांच्या नेतृत्वाखाली शासनाला निवेदन

रिसोड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; आमदार अमित झनक यांच्या नेतृत्वाखाली शासनाला निवेदन

Risod Taluka drought: रिसोड तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने खरीप हंगामातील पिकांवर मोठे संकट ओढवले आहे. पावसाअभावी अनेक भागांतील पिके करपण्याच्या मार्गावर असून

Sep 08, 2026