रिसोड महसूल लोक अदालत

रिसोड तहसील कार्यालयाचा उपक्रम: महसूल लोक अदालतीतून ८ शेतरस्त्यांचे वाद सामंजस्याने निकाली

Risod Revenue Lok Adalat: शेतात ये-जा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या शेतरस्त्यांचे प्रलंबित वाद 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियाना'अंतर्गत रिसोड तहसील कार्यालयात सामंजस्य

रिसोड तहसील कार्यालयाचा उपक्रम: महसूल लोक अदालतीतून ८ शेतरस्त्यांचे वाद सामंजस्याने निकाली

Risod Revenue Lok Adalat

​रिसोड (Risod Revenue Lok Adalat) : शेतात ये-जा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या शेतरस्त्यांचे प्रलंबित वाद 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियाना'अंतर्गत रिसोड तहसील कार्यालयात सामंजस्याने मिटवण्यात आले. यामुळे दीर्घकाळापासून वादात अडकलेल्या संबंधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ​महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ दरम्यान राबविल्या जाणाऱ्या अभियानांतर्गत ही कार्यवाही करण्यात आली. तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्याकडील ५ आणि निवासी नायब तहसीलदार रावसाहेब देशपांडे यांच्याकडील ३ अशी एकूण ८ प्रकरणे दोन्ही बाजूंच्या सहमतीने निकाली काढण्यात आली.

​मंडळ अधिकारी जावळे, संबंधित ग्राम महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कागदपत्रांची पडताळणी आणि प्रत्यक्ष परिस्थितीचा अभ्यास करून शेतकऱ्यांशी सकारात्मक संवाद साधला. यापूर्वीही रिसोड कार्यालयाने अशाच प्रकारे ३९ प्रकरणांत यशस्वी तोडगा काढला आहे. सामंजस्य आणि संवादाच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांच्या शेतीकामातील अडथळे दूर झाले असून प्रशासनाच्या या संवेदनशील भूमिकेचे कौतुक होत आहे.