मेंदू 'अॅन्युरिझम' शस्त्रक्रिया

शासकीय रुग्णालयात मेंदूतील 'अॅन्युरिझम'वर यशस्वी शस्त्रक्रिया

Brain Aneurysm Surgery: लातूरमध्ये विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयात एका ७० वर्षीय महिलेच्या मेंदूतील अॅन्युरिझमवर यशस्वी शस्त्रक्रिया केली गेली, ज्यामुळे तिचे प्राण वाचले.

शासकीय रुग्णालयात मेंदूतील 'अॅन्युरिझम'वर यशस्वी शस्त्रक्रिया

Brain Aneurysm Surgery

७० वर्षीय महिलेला मिळाले नवजीवन : अत्याधुनिक न्युरोसर्जरी सुविधांचा 'लातूर पॅटर्न'!

लातूर (Brain Aneurysm Surgery) : लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय अतिविशेषोपचार रुग्णालयातील डॉक्टरांनी मेंदूतील अत्यंत गुंतागुंतीच्या आणि जीवघेण्या 'अॅन्युरिझम' या आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया करून एका ७० वर्षीय महिला रुग्णाचे प्राण वाचविले आहेत. या यशस्वी उपचारामुळे शासकीय रुग्णालयातील अत्याधुनिक न्युरोसर्जरी सुविधा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

संबंधित रुग्ण महिला डोकेदुखी, उलट्या आणि अचानक शुद्ध हरपणे अशा गंभीर तक्रारींसह रुग्णालयात दाखल झाली होती. तातडीने करण्यात आलेल्या सिटी स्कॅन व एंजिओग्राफी तपासणीत रुग्णाच्या मेंदूतील 'अँटेरियर कम्युनिकेटिंग आर्टरी'मध्ये अॅन्युरिझम (Brain Aneurysm Surgery) फुटल्याचे निदान झाले. अॅन्युरिझम म्हणजे मेंदूतील रक्तवाहिन्या कमकुवत होऊन तयार झालेला फुगवटा. हा फुगवटा फुटल्यास मेंदूत रक्तस्राव होऊन मृत्यूचा मोठा धोका असतो.

रुग्णाची गंभीर प्रकृती पाहता न्युरोसर्जरी विभागाने तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नितीन बर्डे व त्यांच्या तज्ज्ञ पथकाने 'अॅन्युरिझम क्लिपिंग' ही अत्यंत जटिल शस्त्रक्रिया पार पाडली. या प्रक्रियेत फुगलेली रक्तवाहिनी सुरक्षितपणे क्लिप करून रक्तस्राव थांबविण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर आयसीयूमध्ये न्युरोसर्जरी आणि बधिरीकरणशास्त्र विभागाच्या समन्वयाने रुग्णाची विशेष काळजी घेण्यात आली.

ही (Brain Aneurysm Surgery) यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडण्यात विशेष कार्य अधिकारी डॉ. सुनील होळीकर, न्युरोसर्जरी विभागप्रमुख डॉ. हनुमंत किनीकर, डॉ. नितीन बर्डे, डॉ. शीतल अग्रोया, डॉ. संगिता कदम, डॉ. कृष्णमूर्ती कोकणकर, डॉ. निखिला सुभाषिनी, डॉ. वैजनाथ फड, डॉ. बुमेश्वरी तसेच बधिरीकरणशास्त्र विभागाचे डॉ. विनायक शिरसाठ, विभागप्रमुख डॉ. संगिता आगळे, डॉ. संतोष चिंचकर, डॉ. संतोष चव्हाण, डॉ. साईनाथ कुंटे, डॉ. आरती काचेकर व डॉ. सेल्वामूर्ती यांच्या पथकाचा समावेश होता. यावेळी उप अधिष्ठाता डॉ. उमेश कानडे, डॉ. मंगेश सेलुकर, डॉ. अजय ओव्हाळ, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गरुड आणि डॉ. महादेव बनसुडे यांची उपस्थिती होती.

मोफत उपचारांचे आवाहन

या (Brain Aneurysm Surgery) यशस्वी शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली असून नातेवाईकांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत. लातूरमध्येच अशा उच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध झाल्याने आता गंभीर रुग्णांना मोठ्या शहरात जाण्याची गरज कमी झाली आहे. गरजू रुग्णांनी अशा शस्त्रक्रियांचा लाभ महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत घ्यावा, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते यांनी केले आहे.

संबंधित सामग्री

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

Latur Farmers' Organization: गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकरी संघटनांनी केली. तर मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगाम..

Oct 06, 2026
लैंगिक अत्याचारप्रकरणी २० वर्षे सश्रम कारावास!

लैंगिक अत्याचारप्रकरणी २० वर्षे सश्रम कारावास!

Latur Sexual Assault Case: नागझरी येथे आरोपीने १२ वर्षीय मुलीच्या भोळसर स्वभावाचा गैरफायदा घेत तिला लातूर शहर फिरवून आणण्याचे सांगितले. त्यानंतर तिला दुचाकीवरून पुणे

Oct 02, 2026
नांदेड उप महानिरीक्षकांच्या पथकाने घातले, लातूर पोलिसांच्या डोळ्यात झणझणीत अंजन 

नांदेड उप महानिरीक्षकांच्या पथकाने घातले, लातूर पोलिसांच्या डोळ्यात झणझणीत अंजन 

Latur Matka-Gambling Raid: लातूरचे पोलीस हेल्मेट सक्तीच्या कामगिरीत गुंतले असताना दुसरीकडे नांदेडच्या पोलीस उप महानिरीक्षकांच्या पथकाने लातूर शहर जिल्ह्यात राजरोस चालणाऱ्या मटका व जुगारांवर धाड..

Oct 01, 2026
हेल्मेट सक्तीमुळे अपघाती मृत्युसंख्येत घट

हेल्मेट सक्तीमुळे अपघाती मृत्युसंख्येत घट

Latur Helmet Rule Mandatory: गेल्या महिनाभरात झालेल्या अपघाती मृत्यूच्या आकडेवारीतून लातूर पोलिसांच्या हेल्मेट सक्तीचा सकारात्मक परिणाम झाल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केला. ऑगस्ट मधील ३३ अपघाती मृत्यू

Oct 01, 2026
दुहेरी खून प्रकरणात पाच जणांना जन्मठेप! 

दुहेरी खून प्रकरणात पाच जणांना जन्मठेप! 

Latur Double Murder Case: डांगेवाडी येथे पाणंद रस्त्याच्या वादातून झालेल्या दुहेरी खून प्रकरणात पाच आरोपींना निलंगा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने 29 सप्टेंबर 2026 रोजी जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावल

Sep 30, 2026