Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > शेती

तरुण शेतकरी मृत्यू

नांगरणी करताना तरुण शेतकर्‍यावर वीज कोसळल्याने जागीच मृत्यू

Youth Farmer Death: भानखेडा येथे शेतकरी जगन सिताराम कोटकर यांचा जागीच मृत्यू होणारा घटना, वीजकोसळल्याने झालेल्या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.


नांगरणी करताना तरुण शेतकर्‍यावर वीज कोसळल्याने जागीच मृत्यू  

Youth Farmer Death |


भानखेडा गावावर शोककळा: पेरणीपूर्व मशागती दरम्यान घडली दुर्दैवी घटना

सेनगाव (Youth Farmer Death) : तालुक्यातील भानखेडा येथे शेतात नांगरणीचे काम सुरू असताना अचानक वीज कोसळून एका ३५ वर्षीय तरुण शेतकर्‍याचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी, २५ मे रोजी रात्री घडली. जगन सिताराम कोटकर असे मृत शेतकर्‍याचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण भानखेडा गावावर शोककळा पसरली आहे.

भानखेडा शिवारात जगन कोटकर यांची सुमारे दोन एकर शेती आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सध्या पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू आहेत. दिवसभर प्रचंड उष्मा असल्याने अनेक शेतकरी सकाळी व सायंकाळी शेतीची कामे करतात. त्यानुसार जगन कोटकर हे सोमवारी सायंकाळी नागोजी कोटकर व रामकिसन कोटकर यांच्यासह शेतात नांगरणीसाठी गेले होते. रात्री साडेनऊच्या सुमारास परिसरात अचानक वादळी वार्‍यासह विजांचा कडकडाट सुरू झाला आणि मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. याचवेळी विजेचा जोरदार लोळ जगन कोटकर यांच्या अंगावर कोसळला. या (Youth Farmer Death) भीषण घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने त्यांच्यासोबत असलेले नागोजी व रामकिसन काही अंतरावर असल्याने ते थोडक्यात बचावले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी तातडीने महसूल कर्मचार्‍यांना घटनास्थळी पाठवून पंचनामा केला. सेनगाव पोलिस प्रशासनानेही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. 

मयत जगन कोटकर (Youth Farmer Death) यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व भाऊ असा परिवार आहे. कष्टाळू व मनमिळावू स्वभावामुळे परिसरात परिचित असलेल्या जगन यांच्या अकाली निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Related to this topic: