पीक कर्ज सुविधा स्टॉल

महाराजस्व अभियानात 'पीक कर्ज सुविधा स्टॉल' सुरू करण्याची मागणी

Crop loan facility stalls: आगामी 'महाराजस्व अभियानात' गरजू शेतकऱ्यांसाठी विशेष 'पीक कर्ज मार्गदर्शन व कागदपत्र सुविधा स्टॉल' उभारण्यात यावा, अशी जोरदार मागणी

महाराजस्व अभियानात 'पीक कर्ज सुविधा स्टॉल' सुरू करण्याची मागणी

Crop loan facility stalls

​रिसोड (Crop loan facility stalls) : खरीप हंगाम सुरू होताच तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर पीक कर्जाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बियाणे, खते, औषधे व मशागतीसाठी लागणाऱ्या आर्थिक जुळवाजुळवीसाठी शेतकरी बँकांचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र, कर्ज मंजुरीसाठी लागणाऱ्या विविध कागदपत्रांसाठी महसूल, कृषी व बँक प्रशासनाचे खेटे मारावे लागत असल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर आगामी 'महाराजस्व अभियानात' गरजू शेतकऱ्यांसाठी विशेष 'पीक कर्ज मार्गदर्शन व कागदपत्र सुविधा स्टॉल' उभारण्यात यावा, अशी जोरदार मागणी शेतकरी व विविध संघटनांकडून केली जात आहे.

​कागदपत्रांच्या जुळवाजुळवीत शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाया

​पीक कर्जासाठी (Crop loan facility stalls) ७/१२ उतारा, ८-अ उतारा, उत्पन्नाचा दाखला, ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड), बँक पासबुक यासह अनेक कागदपत्रांची आवश्यकता असते. ही सर्व कागदपत्रे मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांत फेऱ्या माराव्या लागतात. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया जात असून त्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महाराजस्व अभियानात एकाच छताखाली सर्व विभागांचे समन्वय साधून सुविधा उपलब्ध झाल्यास कर्ज प्रक्रिया जलद व सुलभ होऊ शकते.

राष्ट्रीयीकृत बँकांचे मंद धोरण; शेतकरी चिंतेत

​यंदाच्या खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाचे दिलेले उद्दिष्ट अद्याप पूर्ण झालेले नाही. विशेषतः राष्ट्रीयीकृत बँकांकडून अपेक्षित वेगाने कर्ज वितरण होत नसल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. अनेक शेतकरी अजूनही कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत.

​'एक खिडकी' सुविधेची गरज

​महाराजस्व अभियानात पीक कर्जासाठी स्वतंत्र स्टॉल सुरू झाल्यास महसूल, कृषी व बँक अधिकारी एकाच ठिकाणी उपलब्ध राहतील. आवश्यक कागदपत्रे व दाखले त्वरित देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तर कर्ज मंजुरीची प्रक्रिया अधिक वेगवान होईल. त्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून आगामी अभियानात ही सुविधा त्वरित उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

संबंधित सामग्री

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं आवाहन; ‘उत्सवांचा निधी शेतकऱ्यांसाठी द्या’

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं आवाहन; ‘उत्सवांचा निधी शेतकऱ्यांसाठी द्या’

महाराष्ट्रातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्सव साधेपणाने साजरे करून निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी वापरण्याचं आवाहन केलं.

Oct 01, 2026
ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्याची नापिकीमुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्याची नापिकीमुळे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

ब्राह्मणवाडा येथील ५९ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी तानाजी मोरे यांनी नापिकीच्या चिंतेत विषारी औषध प्राशन केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Sep 29, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळाच्या निकषांमध्ये बदल; ३३ टक्क्यांहून अधिक पीकनुकसान असल्यास गाव दुष्काळी घोषित होण्याची शक्यता

महाराष्ट्रातील दुष्काळाच्या निकषांमध्ये बदल; ३३ टक्क्यांहून अधिक पीकनुकसान असल्यास गाव दुष्काळी घोषित होण्याची शक्यता

महाराष्ट्रातील दुष्काळाच्या मूल्यांकनासाठी सुधारित निकष; पर्जन्यमानासोबत पीकनुकसान, मृदा आर्द्रता, भूजल पातळी व इतर घटकांचा विचार होणार.

Sep 22, 2026
ईसापूर धरणात गतवर्षी ९९ टक्के, तर यंदा ६८ टक्के पाणीसाठा

ईसापूर धरणात गतवर्षी ९९ टक्के, तर यंदा ६८ टक्के पाणीसाठा

ईसापूर धरणात यंदा ६८.८४ टक्के उपयुक्त पाणीसाठा; गतवर्षी ९९.०१ टक्के होता. कमी पावसामुळे रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्धतेचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

Sep 21, 2026
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहनपर अनुदान जमा करा

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहनपर अनुदान जमा करा

Manora Farmer Subsidy: शासनाकडून 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' अंतर्गत नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना खात्यात प्रोत्साहनपर लाभ जमा करावा

Sep 10, 2026