Isapur Dam

ईसापूर धरणात गतवर्षी ९९ टक्के, तर यंदा ६८ टक्के पाणीसाठा

ईसापूर धरणात यंदा ६८.८४ टक्के उपयुक्त पाणीसाठा; गतवर्षी ९९.०१ टक्के होता. कमी पावसामुळे रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्धतेचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

ईसापूर धरणात गतवर्षी ९९ टक्के, तर यंदा ६८ टक्के पाणीसाठा

Isapur Dam

कळमनुरी : पावसाळा संपत आला तरी उर्ध्व पेनगंगा प्रकल्प अर्थात ईसापूर धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. २१ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता धरणाची पाणीपातळी ४३७.८९० मीटर नोंदविण्यात आली. गतवर्षी याच तारखेला पाणीपातळी ४४०.९० मीटर होती. यंदा पाणीपातळी ३.०१ मीटरने कमी आहे.

धरणातील एकूण पाणीसाठा ९७८.६६२४ दलघमी (३४.५६३ टीएमसी) असून उपयुक्त पाणीसाठा ६६३.६९८७ दलघमी (२३.४४० टीएमसी) आहे. उपयुक्त साठ्याची टक्केवारी ६८.८४ टक्के आहे. गतवर्षी याच दिवशी उपयुक्त पाणीसाठा ९५४.५३५५ दलघमी म्हणजेच ९९.०१ टक्के होता.

मागील २४ तासांत धरणात केवळ ०.२७४२ दलघमी पाण्याची आवक झाली असून सरासरी आवक ३.१७४ क्युमेक्स (११२ क्युसेक्स) आहे. १ जूनपासून आतापर्यंत एकूण २७९.७४४३ दलघमी पाण्याची आवक झाली आहे. यंदा १ जूनपासून आतापर्यंत ५७८ मिमी पावसाची नोंद झाली असून २१ सप्टेंबर रोजी पावसाची नोंद शून्य आहे.

पावसाळा संपत आला तरी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नसल्याने आगामी काळातील पाणी नियोजनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यंदा सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने शेतकऱ्यांना खरीप हंगामात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता पुढील रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्ध होणार का आणि पीक कसे घ्यायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

Latur Farmers' Organization: गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकरी संघटनांनी केली. तर मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगाम..

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
ठेकेदाराच्या मनमानीचा फटका; कळमनुरीतील तीन भाग आठ दिवसांपासून तहानलेले!

ठेकेदाराच्या मनमानीचा फटका; कळमनुरीतील तीन भाग आठ दिवसांपासून तहानलेले!

Kalamnuri Municipal Council: डे-नाईट मेडिकलच्या बाजूला पाणीपुरवठ्याची पाईपलाईन संबंधित गुत्तेदाराच्या कामादरम्यान फुटल्याने पठाण गल्ली, माली गल्ली, ताजनगर यासह परिसरातील नागरिकांना मागील आठ दिवस..

Oct 06, 2026