खेडी शेतात आग

खेडी शेतात आग लागुन गावालगत पोहचली.. 

Khedi Farm fire: खेडी गावाजवळ शेतात आग लागली, गावक-यांच्या तत्परतेमुळे आग नियंत्रणात आली आणि मोठे नुकसान टळले.

खेडी शेतात आग लागुन गावालगत पोहचली.. 

Khedi Farm fire

गावक-यांच्या बचाव कार्यामुळे गाव आगीपासुन थोडक्या वाचले

कन्हान (Khedi Farm fire) : खेडी गावालगत कापणी झावेल्या गव्हा च्या शेतात अचानक आग लागुन जोरदार वा-यामुळे वाढुन जवळपास ५० एकरातील शेतातील गव्हु पिका चा कचरा जळुन राख झाला. मोठया प्रमाणात गाव करी युवक व नागरिकांच्या बचाव कार्य तसेच कन्हान नगरपरिषदेच्या अग्निशमक दल व बंब वाहनामुळे आगीवर नियंत्रण मिळाल्याने थोडक्यात गाव वाचले. 

शुक्रवार (दि.२७) मार्च ला दुपारी २.३० वाजता दरम्यान अचानक हवामान बदलुन जोरदार वारा वाहु लागला. तेव्हाच खेडी (खोपडी) गावालगत बहुतेक शेतातील गहु हॉरवेस्टर काढल्याने गव्हाचा कचरा शेतात पडुन होता. अश्या कुण्यातरी गहु कापणी झाले ल्या शेतात आग लागुन जोरदार हवेमुळे एका शेतातुन दुस-या शेतात वाढत जाऊन गावाकडे येताना पाहुन गावक-यांनी धाव घेऊन आग विझविण्याचा अतोनात पर्यंत केला. काही गावक-यांनी कन्हान नगरपरिषद आणि तहसिलदार पारशिवनी ला माहिती दिल्याने कन्हान नगरपरिषदेची अग्निशमक दल, बंब वाहन गाडी तातडीने पोहचुन आगीवर नियंत्रण मिळविल्याने खेडी गावातील घरे वाचल्याने थोडक्यात गाव आगी पासुन बचावले.

खेडी शिवारातील जवळपास ५० एकरात ही आग लागुन गव्हाच्या कच-याची राख झाली. काही शेतात गहु पीक कापणी करून गहु ठेव ला होता परंतु लोकांच्या मदतीने तो गहु तात्काळ उच लुन सुरक्षित स्थळी नेण्यात आल्याने गहु पिकाचे नुकसान झाले नाही. ही आग विझविण्याकरिता गावा तील तरूण मंडळी व नागरिकांनी मोठया प्रमाणात धावुन गेले. यात पटवारी ताई, कोतवाल साहेब, विनोद इंगळे, मंगेश कडु, तुकेश घरजाळे, सुशिल ठाकरे, पोलीस पाटील, क्रिष्णा चौधरी, जितेंद्र वैद्य, देवराव इंगळे, दुर्गेश, भीमराव पांडे, रोशन, प्रशांत, प्रकाश, चंद्रशेखर, दिलीप, विनोद, प्रकाश, पांडुरंग, महेंद्र, अजय, प्रल्हाद मोहिते, महिला व पुरुषांनी आग आटोक्यात आण्याकरिता अतोनात पर्यंत केल्याने गाव थोडक्यात आगी पासुन वाचले.

संबंधित सामग्री

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

हिंगोली फटाका गोदाम दुर्घटना: मृतांच्या वारसांना शिवसेनेकडून 5 लाखांची मदत जाहीर

Hingoli firecracker godown accident: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात सांगितले..

Oct 07, 2026
फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यांचा अवैध साठा व विक्री करू नका; पोलिस प्रशासनाचे व्यापार्‍यांना आवाहन

फटाक्यांचा अवैध साठा व विक्री करू नका; पोलिस प्रशासनाचे व्यापार्‍यांना आवाहन

Illegal firecracker stockpile: हिंगोली शहरातील कपडा गल्ली येथे फटाक्याच्या गोदामाला आग लागून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कळमनुरी पोलीस स्टेशनकडून जाहीर सूचना जारी करण्यात आली आहे.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026