परभणीत पिक विमा

परभणीत पिक विमा भरपाईसाठी आंदोलनाचा इशारा, डॉ. राहुल पाटील यांचा निर्धार

Parbanit crop insurance: परभणीत खरीप हंगाम 2025 दरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या पिकांना नुकसान झाले. डॉ. राहुल पाटील यांनी पिक विमा भरपाई

परभणीत पिक विमा भरपाईसाठी आंदोलनाचा इशारा, डॉ. राहुल पाटील यांचा निर्धार

Parbanit crop insurance

आ. डॉ. राहुल पाटील यांनी दिला इशारा खरीप हंगाम २०२५

परभणी (Parbanit crop insurance) : पिक विम्याची रक्कम १५ दिवसात मिळाली पाहीजे,  अन्यथा आंदोलन करु असा इशारा आ.डॉ. राहुल पाटील यांनी दिला आहे. कोरड्या अवस्थेतील पिक कापणी प्रयोगाचा अहवाल कंपनीला तातडीने देऊन कारवाई करा, अशा सुचना आ. पाटील यांनी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांना केल्या आहेत.

परभणी जिल्ह्यात खरीप हंगाम २०२५ मध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे (Parbanit crop insuranc)e अतोनात नुकसान झाले. जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांनी पिक विमा काढला होता. परंतु शेतकर्‍यांना अद्यापही पीक विम्याची रक्कम मिळाली नाही, संबंधित पिक विमा कंपनीने शासनाच्या काही पीक कापणी धोरणाचा गैरफायदा उचलला आहे. पीक कापणी प्रयोग करताना २०२५ मध्ये सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात पाऊस असल्याने जमिनीत पाणी होते, पिकेही ओली होती, यामुळे शासनाने ओल्या पिकांसोबतच कोरड्या पिकांचे देखील पीक कापणी प्रयोग ग्राह्य धरणाच्या सूचना दिल्या होत्या, त्यामुळे कंपनीने याचा गैरफायदा घेत चुकीचा अर्थ काढत तांत्रिक बाब समोर करत दोन अहवाल कसे काय ?

हा मुद्दा उपस्थित करत परभणी जिल्ह्याचा पिक विमा मंजूर केला नाही. त्यामुळे लाखो शेतकरी पिक विम्याच्या भरपाई पासून वंचित आहेत. वास्तविक मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही पिक विमा कंपनीने तांत्रिक बाब पुढे करत पळवाट काढली आहे. यामुळे आ. डॉ. राहुल पाटील यांनी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांना पिक विमा कंपनीला अहवाल पाठवण्याच्या सूचना केल्या आहेत. कोरड्या पीक कापणीचा अहवाल ग्राह्य धरा आणि लवकर पिक विमा (Parbanit crop insurance) भरपाई द्या, याबाबत तातडीने अहवाल द्या अशा सूचना आ. पाटील यांनी केली आहे. अन्यथा पंधरा दिवसात परभणीत तीव्र आंदोलन करू असा इशारा आ. पाटील यांनी यावेळी दिला.

संबंधित सामग्री

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

परभणीत धान्य चोरीचा गुन्हा उघड;आंतरराज्यीय गुन्हेगार जेरबंद

Parbhani Grain Theft: धान्य चोरीचा गुन्हा अवघ्या चोवीस तासात उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी एका आंतरराज्यीय गुन्हेगाराला जेरबंद केले आहे..

Oct 07, 2026
परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

परभणीतील कान्हा शिवारात हळदीच्या पिकाच्या गांजाची लागवड

Parbhani Cannabis cultivation: तालुक्यातील कान्हा शेत शिवारात हळदीच्या पिकात बेकायदेशीरपणे केलेल्या गांजाच्या लागवडीवर स्थानिक गुन्हे शाखा, बामणी पोलिसांच्या संयुक्त पथकाने छापा टाकला.

Oct 07, 2026
मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींशी १ तास भेट, अर्धा तास दुष्काळावर चर्चा; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा

मोदींसोबतच्या भेटीत महाराष्ट्राच्या दुष्काळावर चर्चा झाल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा. शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीचे आश्वासन.

Oct 07, 2026
शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

महाराष्ट्रातील मान्सून संकट आणि पंजाब-हरियाणातील खतटंचाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेतीसमोरील धोके आणि सरकारी कृषी धोरणांचा आढावा.

Oct 05, 2026
परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

Parbhani Accused Arrested: पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे आदेशाने स्थागुशा पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद

Oct 02, 2026