परभणी शेतकरी आत्महत्या

परभणीत कर्जबाजारीपणातून सारंगापूर येथील शेतकर्‍याची आत्महत्या

Parbhani Farmer suicides: तालुक्यातील सारंगापूर येथे कर्जाच्या तणावातून ५५ वर्षीय शेतकर्‍याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रविवार २७ सप्टेंबर रोजी रात्री घडली. बन्सी आश्रोबा चौखट

परभणीत कर्जबाजारीपणातून सारंगापूर येथील शेतकर्‍याची आत्महत्या

Parbhani Farmer suicides

 

विषारी द्रव्य प्राशन करुन संपविले जीवन; मानवत पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद

मानवत (Parbhani Farmer suicides) : तालुक्यातील सारंगापूर येथे कर्जाच्या तणावातून ५५ वर्षीय शेतकर्‍याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना रविवार २७ सप्टेंबर रोजी रात्री घडली. बन्सी आश्रोबा चौखट असे मयत शेतकर्‍याचे नाव असून या प्रकरणी मानवत पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, बन्सी चौखट यांच्यावर बँकेचे कर्ज असल्याने ते काही दिवसापासून चिंतेत होते. कर्ज कसे फेडायचे या विवंवचेत होते.याबाबत ते नातेवाइकांकडे चिंता व्यक्त करत असल्याचे त्यांचा पुतण्या अनिल चौखट  यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत नमूद केले आहे.  रविवार २७ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ते शेताकडे गेले होते. तेथे त्यांनी कर्ज कसे फेडू म्हणून विषारी औषध प्राशन करून जीव देत असल्याचे त्यांचा मुलगा पांडूरंग यास फोन करुन सांगितल्याची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी शेताकडे धाव घेतली.

त्यावेळी ते चिंचेच्या झाडाखाली पडलेल्या अवस्थेत आढळले. त्यांच्या शेजारी औषधाचा डबा पडलेला होता. नातेवाइकांनी उपचारासाठी त्यांना परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल  केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. या घटनेची मानवत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

संबंधित सामग्री

परभणीत कर्ज कसे फेडावे या विवंचनेत विहिरीत घेतली उडी

परभणीत कर्ज कसे फेडावे या विवंचनेत विहिरीत घेतली उडी

Parbhani Farmer suicides: शेतीसाठी वडिलांनी घेतलेले कर्ज कसे फेडावे, पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी झालेला खर्च आणि पावसामुळे शेतीवरील खर्च कसे निघेल, या विवंचनेत एका तरुण शेतकर्‍यांची आत्महत्या...

Oct 14, 2026
परभणीत बंजारा आरक्षण मागणीसाठी तरुणाने घेतला गळफास

परभणीत बंजारा आरक्षण मागणीसाठी तरुणाने घेतला गळफास

Parbhani Youth Suicide: बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना जिंतूर तालुक्यातील केहाळ तांडा येथे घडली.

Oct 14, 2026
परभणीत कार-ऑटोचा अपघात; ऑटोचालकाचा मृत्यू

परभणीत कार-ऑटोचा अपघात; ऑटोचालकाचा मृत्यू

Parbhani car-auto accident: भरधाव वेगातील कारने ऑटोला समोरासमोर दिलेल्या धडकेत ऑटो चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवार १३ ऑक्टोबर रोजी रात्री अंदाजे १० वाजेच्या सुमारास शहरातील भगवती कॉर्नरवर

Oct 14, 2026
परभणीत सततच्या नापीकीला कंटाळुन पिले तननाशक

परभणीत सततच्या नापीकीला कंटाळुन पिले तननाशक

Purna Farmer Suicides: शेतातील सततच्या नापीकीला कंटाळुन तननाशक प्राशन केलेल्या शेतकर्‍याचा उपचारादरम्यान मंगळवार १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला.

Oct 13, 2026
परभणीत तिडीपिंपळगावात शॉर्ट सर्कीटने तीन एकर ऊस जळून खाक

परभणीत तिडीपिंपळगावात शॉर्ट सर्कीटने तीन एकर ऊस जळून खाक

Parbhani Sugarcane Burn: तालुक्यातील तिडीपिंपळगाव येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत महिला शेतकरी राधाबाई किशनराव घूमरे यांचा तीन एकर ऊस जळून खाक झाला.

Oct 13, 2026