परभणी गुन्हेगार हद्दपार

परभणी जिल्ह्यातून पाच जणांना केले हद्दपार

Parbhani Criminals Banished: जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दितील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातून  पाच व्यक्तींना हद्दपार करण्यात आले आहे.

परभणी जिल्ह्यातून पाच जणांना केले हद्दपार

Parbhani Criminals Banished

 

 गुंड प्रवृत्तीच्या इसमांचा समावेश; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कारवाई

परभणी (Parbhani Criminals Banished) : जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दितील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातून  पाच व्यक्तींना हद्दपार करण्यात आले आहे. या कारवाईसाठी स्थागुशाचे पोनि. गजेंद्र सरोदे यांनी पाठपुरावा केला. 

पोलीस ठाणे पूर्णा हद्दितील टोळी प्रमुख अंकित उर्फ बाळा संजय गायकवाड तसेच त्याच्या टोळीतील आयुष राजेंद्र बरकुंटे, श्रीनिवास रमेश गाढवे यांच्याविरुध्द स्थानिक गुन्हे शाखेने हद्दपारीचा प्रस्ताव पाठविला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी पूर्णा यांनी या प्रस्तावाची प्राथमिक चौकशी केली. अंतीम चौकशी करत पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी अंकित उर्फ बाळा संजय गायकवाड, आयुष राजेंद्र बरकुंटे यांना एक वर्षासाठी तसेच श्रीनिवास रमेश गाढवे याला परभणी तसेच लगतच्या हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुका नांदेड तालुका क्षेत्रातून हद्दपार करण्यात आले आहे.

नवा मोंढा पोलीस ठाणे हद्दितील विवेक धनेश्वर साळवे याला सहा महिन्याकरीता तर कोतवाली हद्दितील सोहेल खान नय्युम खान याला एक वर्षाकरीता परभणी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.