Waiting Ticket

रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा! ऑनलाइन वेटिंग तिकीटाच्या 'ऑटो कॅन्सलेशन' नियमात बदलाची तयारी

रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा! ऑनलाइन वेटिंग तिकीटाच्या 'ऑटो कॅन्सलेशन' नियमात बदलाची तयारी

Waiting Ticket

चार्ट तयार झाल्यानंतरही ऑनलाइन वेटिंग तिकीट वैध ठेवण्याचा रेल्वे मंत्रालयाचा विचार; जनरल डब्यात प्रवासाची मिळू शकते परवानगी

(Waiting Ticket) रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ऑनलाइन तिकीट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना वारंवार भेडसावणारी वेटिंग तिकीटाची समस्या सोडवण्यासाठी रेल्वे मंत्रालय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रस्तावानुसार, ऑनलाइन बुक केलेले वेटिंग तिकीट चार्ट तयार झाल्यानंतर आपोआप रद्द करण्याचा विद्यमान नियम रद्द करण्याचा विचार सुरू आहे.

सध्या लागू असलेल्या नियमानुसार, प्रवाशाने ऑनलाइन आरक्षित तिकीट बुक केले आणि अंतिम चार्ट तयार झाल्यानंतरही ते वेटिंगमध्येच राहिले, तर ते तिकीट आपोआप रद्द केले जाते. त्यानंतर कर आणि इतर लागू शुल्क वजा करून उर्वरित रक्कम संबंधित प्रवाशाच्या खात्यात परत जमा केली जाते. त्यामुळे अनेक प्रवाशांना पुन्हा जनरल तिकीट काढून प्रवास करावा लागतो.

विशेषतः सणासुदीच्या काळात किंवा सुट्यांच्या हंगामात ही अडचण अधिक जाणवते. प्रवासी आगाऊ ऑनलाइन आरक्षण करतात, मात्र तिकीट कन्फर्म न झाल्यास चार्टनंतर ते आपोआप रद्द होते. त्यामुळे नियोजित प्रवासात अडथळे निर्माण होतात.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे मंत्रालय ऑनलाइन वेटिंग तिकीटावरील ऑटो कॅन्सलेशनची अट हटविण्याचा विचार करत आहे. हा निर्णय लागू झाल्यास, चार्ट तयार झाल्यानंतरही वेटिंगमध्ये राहिलेले ऑनलाइन तिकीट वैध राहू शकते. अशा परिस्थितीत प्रवाशांना त्याच डिजिटल तिकिटाच्या आधारे जनरल डब्यात प्रवास करण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे.

याउलट, रेल्वेच्या आरक्षण खिडकीतून घेतलेल्या वेटिंग तिकिटांवर सध्या प्रवाशांना जनरल डब्यात प्रवास करण्याची मुभा आहे. त्यामुळे ऑनलाइन आणि ऑफलाइन तिकीट नियमांमधील हा फरक दूर होण्याची शक्यता या प्रस्तावामुळे निर्माण झाली आहे.

भारतीय रेल्वेच्या एकूण आरक्षित तिकिटांपैकी सुमारे ८५ टक्के तिकीटे ऑनलाइन बुक केली जातात. त्यामुळे प्रस्तावित बदलाची अंमलबजावणी झाल्यास मोठ्या संख्येने प्रवाशांना त्याचा थेट फायदा होईल. विशेषतः वेटिंगमुळे प्रवास रद्द करणाऱ्या किंवा पुन्हा स्वतंत्र जनरल तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशांसाठी हा निर्णय मोठा दिलासा ठरू शकतो.

संबंधित सामग्री

मुंबई-बंगळुरू स्लीपर वंदे भारतचा मार्ग ठरला? सोलापूरमार्गे धावणार; पश्चिम महाराष्ट्रातील शहरांचा पत्ता कट

मुंबई-बंगळुरू स्लीपर वंदे भारतचा मार्ग ठरला? सोलापूरमार्गे धावणार; पश्चिम महाराष्ट्रातील शहरांचा पत्ता कट

मुंबई-बंगळुरू स्लीपर वंदे भारत पुणे-सोलापूरमार्गे धावण्याचा प्रस्ताव आहे. सुमारे 16 तासांचा प्रवास, सहा दिवस सेवा आणि सात प्रस्तावित थांबे असतील.

Oct 04, 2026
चौक-कर्जत रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला मंजुरी; 497 कोटींचा प्रकल्प, प्रवासी-मालवाहतुकीला मोठा फायदा

चौक-कर्जत रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला मंजुरी; 497 कोटींचा प्रकल्प, प्रवासी-मालवाहतुकीला मोठा फायदा

चौक-कर्जत रेल्वे मार्गाच्या 10.86 किमी दुपदरीकरणाला मंजुरी. 497 कोटींच्या प्रकल्पामुळे प्रवासी गाड्या आणि मालवाहतुकीची क्षमता वाढणार आहे.

Sep 18, 2026
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; सात हाय-डेन्सिटी रेल्वे कॉरिडॉरवर चार मार्गिका

केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; सात हाय-डेन्सिटी रेल्वे कॉरिडॉरवर चार मार्गिका

केंद्रीय मंत्रिमंडळाने सात हाय-डेन्सिटी रेल्वे कॉरिडॉरवर चार मार्गिका उभारण्यास मंजुरी दिली आहे. दिल्ली-मुंबई, कोलकाता-दिल्ली, चेन्नई-कोलकाता आणि मुंबई-चेन्नई मार्गांचाही विस्तार केला जाणार आहे

Sep 09, 2026
रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू; प्रत्यक्षदर्शी नसला तरी भरपाई नाकारता येणार नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

रेल्वे पकडताना अपघाती मृत्यू; प्रत्यक्षदर्शी नसला तरी भरपाई नाकारता येणार नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

रेल्वे प्रवासादरम्यान झालेल्या अपघाताच्या भरपाईबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. रे

Aug 21, 2026
मध्य रेल्वे भुसावळ विभागात ‘ऑपरेशन उपलब्ध’ अंतर्गत अवैध ई-तिकीट विक्रीविरुद्ध कारवाई

मध्य रेल्वे भुसावळ विभागात ‘ऑपरेशन उपलब्ध’ अंतर्गत अवैध ई-तिकीट विक्रीविरुद्ध कारवाई

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील रेल्वे सुरक्षा बल (RPF) कडून दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी ‘ऑपरेशन उपलब्ध’ अंतर्गत पोस्ट मलकापूर येथे अवैध ई-तिकीट विक्रीविरुद्ध प्रभावी कारवाई करण्यात आली.

Aug 21, 2026