मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील रेल्वे सुरक्षा बल (RPF) कडून दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी ‘ऑपरेशन उपलब्ध’ अंतर्गत पोस्ट मलकापूर येथे अवैध ई-तिकीट विक्रीविरुद्ध प्रभावी कारवाई करण्यात आली.
मलकापूर : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील रेल्वे सुरक्षा बल (RPF) कडून दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी ‘ऑपरेशन उपलब्ध’ अंतर्गत पोस्ट मलकापूर येथे अवैध ई-तिकीट विक्रीविरुद्ध प्रभावी कारवाई करण्यात आली.
विश्वसनीय माहिती आणि प्राप्त डेटाच्या आधारे आरपीएफ मलकापूरच्या पथकाने कारवाई केली. यावेळी दिनकर संतोषराव आढवे हा अवैधरीत्या ई-तिकीट विक्रीमध्ये सहभागी असल्याचे आढळून आले. त्याच्याकडून एकूण 36 ई-तिकीटे, ज्यांची एकूण किंमत ₹70,672.20, तसेच एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला.
सदर प्रकरणी सीआर क्रमांक 294/2026, रेल्वे कायदा कलम 143 अन्वये गुन्हा दाखल करून आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई आरपीएफ मलकापूरच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची सतर्कता, तत्परता आणि कर्तव्यनिष्ठेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. अवैध ई-तिकीट विक्रीवर आळा घालण्यासाठी तसेच प्रवाशांना अधिकृत माध्यमातून तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी आरपीएफ भुसावळ विभागाकडून सातत्याने प्रभावी देखरेख व कारवाई करण्यात येत आहे.
‘ऑपरेशन उपलब्ध’ अंतर्गत आरपीएफ मलकापूरने केलेली ही कारवाई अवैध ई-तिकीटिंगला आळा घालण्याच्या आणि प्रवाशांना सुरक्षित, पारदर्शक व सुलभ रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
मध्य रेल्वे भुसावळ विभागाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, त्यांनी रेल्वे तिकीटांची बुकिंग केवळ अधिकृत माध्यमातूनच करावी आणि अनधिकृत व्यक्ती किंवा एजंटांकडून तिकीट खरेदी करू नये. अवैध तिकीट विक्री किंवा तत्सम प्रकार आढळल्यास त्याची माहिती तात्काळ जवळच्या आरपीएफ किंवा रेल्वे प्रशासनास द्यावी.