'तहलका'चे माजी संपादक-इन-चीफ तरुण तेजपाल यांना 2013 मधील लैंगिक अत्याचार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दोषी ठरवत मोठा धक्का दिला आहे.
गोवा सरकारचे अपील मंजूर; 2021 मधील निर्दोष मुक्ततेचा सत्र न्यायालयाचा निकाल रद्द, कोठडीचीही मागणी
'तहलका'चे माजी संपादक-इन-चीफ तरुण तेजपाल यांना 2013 मधील लैंगिक अत्याचार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दोषी ठरवत मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाने गोवा सरकारने दाखल केलेले अपील मान्य करत मे 2021 मध्ये सत्र न्यायालयाने दिलेला निर्दोष मुक्ततेचा निर्णय रद्द केला.
या प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिलेल्या 527 पानांच्या निकालाविरोधात गोवा सरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सत्र न्यायालयाने पुराव्यांचे मूल्यमापन करताना गंभीर त्रुटी केल्या तसेच पीडितेच्या साक्षीचा विचार करताना चुकीचा दृष्टिकोन स्वीकारला, असा युक्तिवाद राज्य सरकारतर्फे करण्यात आला होता. यानंतर उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय बाजूला सारत तेजपाल यांना दोषी ठरवले. तसेच गोवा सरकारने त्यांच्या कोठडीचीही मागणी केली आहे.
हे प्रकरण नोव्हेंबर 2013 मधील आहे. गोव्यातील बांबोळी येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये आयोजित 'थिंकफेस्ट' कार्यक्रमादरम्यान हॉटेलच्या लिफ्टमध्ये आपल्या माजी कनिष्ठ सहकाऱ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तरुण तेजपाल यांच्यावर करण्यात आला होता. 7 आणि 8 नोव्हेंबर 2013 च्या रात्री या दोन घटना घडल्याचा आरोप आहे.
घटनेची माहिती माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर गोवा पोलिसांनी पीडितेच्या ईमेल तक्रारीच्या आधारे प्राथमिक चौकशी सुरू केली. त्यानंतर गुन्हा नोंदवून आरोपपत्र दाखल करण्यात आले. मात्र 21 मे 2021 रोजी पणजी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याचे नमूद करत तरुण तेजपाल यांची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली होती.
या निकालाविरोधात गोवा सरकारने उच्च न्यायालयात अपील दाखल केले. सुनावणीदरम्यान सत्र न्यायालयाने पुराव्यांचे मूल्यांकन आणि साक्षीचे परीक्षण करताना कायदेशीर निकषांचे योग्य पालन केले नसल्याचा मुद्दा मांडण्यात आला. या युक्तिवादानंतर 6 ऑगस्ट 2026 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करून तेजपाल यांना दोषी ठरवले.

संपूर्ण घटनाक्रम
- 7 नोव्हेंबर 2013 (रात्र): बांबोळी येथील ग्रँड हयात हॉटेलच्या ब्लॉक 7 मधील गेस्ट लिफ्टमध्ये पहिल्या घटनेत पीडितेला बेकायदेशीरपणे रोखून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप.
- 8 नोव्हेंबर 2013: त्याच हॉटेलच्या ब्लॉक 7 मधील उजव्या बाजूच्या गेस्ट लिफ्टमध्ये दुसरी घटना घडल्याचा आरोप. पीडितेला रोखून तिचे चुंबन घेणे आणि ड्रेस वर करून विनयभंग केल्याचा आरोप.
- 21 नोव्हेंबर 2013: माध्यमांमध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर आणि पीडितेच्या ईमेल तक्रारीच्या आधारे गोवा पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली.
- 24 फेब्रुवारी 2014: पणजी जिल्हा व सत्र न्यायालयात प्रकरण अधिकृतपणे दाखल करण्यात आले.
- 21 मे 2021: अतिरिक्त सत्र न्यायालयाने सर्व आरोपांतून तरुण तेजपाल यांची निर्दोष मुक्तता केली.
- 6 ऑगस्ट 2026: मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने निर्दोष मुक्ततेचा निकाल रद्द करत तरुण तेजपाल यांना दोषी ठरवले.