Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मुंबई

Sexual Assault Case

काळी जादू करून पतीला बरे करण्याचे आमिष; एअर होस्टेसवर अत्याचाराच्या आरोपातील आरोपीला 4 तासांत अटक

मुंबईत एका 25 वर्षीय एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे.


काळी जादू करून पतीला बरे करण्याचे आमिष एअर होस्टेसवर अत्याचाराच्या आरोपातील आरोपीला 4 तासांत अटक

Sexual Assault Case |

तृतीयपंथीयाचा वेष धारण करून अपार्टमेंटमध्ये प्रवेश केल्याचा आरोप; पवई ते कळवा मार्गावरील 100 हून अधिक CCTV फुटेज तपासून पोलिसांची कारवाई

मुंबई : मुंबईत एका 25 वर्षीय एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. आजारी असलेल्या तिच्या पतीला काळी जादू करून बरे करण्याचे आमिष दाखवत आरोपीने घरात प्रवेश करून हा प्रकार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने तपास करत अनिल शिंदे (28) याला अवघ्या चार तासांत कळवा परिसरातील झोपडपट्टीतून अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मंगळवारी दुपारी 12.20 ते 12.50 वाजण्याच्या दरम्यान घडली. आरोपीने तृतीयपंथीयाचा वेष धारण करून सुरक्षा रक्षकाचा विश्वास संपादन केला आणि अपार्टमेंटमध्ये प्रवेश मिळवला. त्यानंतर त्याने इमारतीतील अनेक घरांचे दरवाजे ठोठावल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या एअर होस्टेसने दरवाजा उघडल्यानंतर आरोपीने तिची नजर काढण्याचा बहाणा केला. तसेच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तिच्या पतीला बरे करू शकतो, असेही त्याने तिला सांगितल्याचा आरोप आहे.

पीडितेच्या तक्रारीनुसार घडलेला प्रकार

पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपीने तिच्या डोक्यावर हात ठेवून पाणी ओतले. त्यानंतर तिला बेडरूममध्ये नेऊन डोळे मिटून पलंगावर झोपण्यास सांगितले. यानंतर आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पीडितेने आरडाओरडा सुरू केल्यानंतर आरोपीने तिच्याकडून मिळालेले 200 रुपये घेऊन घटनास्थळावरून पलायन केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

100 हून अधिक CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले

मंगळवारी रात्री सुमारे 11 वाजता पीडितेने पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस उपआयुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक ए. एस. सावंत, निरीक्षक सुशांत बंदगर आणि उपनिरीक्षक संदीप पाटील यांचे विशेष पथक तयार करण्यात आले.

पोलिसांनी पवई ते कळवा या मार्गावरील 100 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून आरोपीच्या हालचालींचा माग काढला. त्यानंतर पहाटे कळवा येथील झोपडपट्टी परिसरातून आरोपी अनिल शिंदेला अटक करण्यात आली.

काळी जादू आणि अंधश्रद्धाविरोधी कायद्याचाही विचार

अनिल शिंदे याच्याविरोधात लैंगिक अत्याचार आणि गुन्हेगारी धमकीच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासादरम्यान या प्रकरणात काळी जादू आणि अंधश्रद्धाविरोधी कायद्यातील तरतुदींचा समावेश होण्याची शक्यता असल्याची माहिती आहे.

चौकशीदरम्यान आरोपीने त्याच्या कुटुंबातील सदस्य तृतीयपंथीयाचा वेष परिधान करून भीक मागत असल्याची माहिती पोलिसांना दिल्याचे सांगण्यात आले आहे. यापूर्वीही त्याने अशाच स्वरूपाचे अनेक गुन्हे केल्याचा संशय असून या सर्व बाबींचा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

 

Related to this topic: