Breaking News
  • तळकोकणात गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; गणपती बाप्पाचे वाजत गाजत आगमन
  • नाशिकच्या बागलाणमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
  • मयूर रथातून होणार दगडूशेठ गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक
  • नागपुरात अतिक्रमणधारकांविरोधात मनपा-पोलिसांची कठोर कारवाई
  • बुलडाण्यात आढळला स्वाइन फ्लूचा रुग्ण
  • मानाचा पहिला कसबा गणपती मंदिरासमोर ढोल वादन सुरू
  • गावा गावातून मराठा बांधव आक्रमक, मुंबईच्या दिशेने निघण्याची तयारी सुरू
  • रायगडमध्ये घरोघरी गणरायाच आगमन
  • बाप्पासाठी चांदीचा थाट! येवल्यात चांदीचे मोदक, फुलं अन् उंदीरमामांची क्रेझ

होम > देश

Parliament Monsoon Session

पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मोठा धक्का; लोकसभा काही मिनिटांत अनिश्चित काळासाठी स्थगित

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी लोकसभेतील कामकाजाला सुरुवात होताच काही मिनिटांतच सभागृह अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले.


पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मोठा धक्का लोकसभा काही मिनिटांत अनिश्चित काळासाठी स्थगित

Parliament Monsoon Session |

PM मोदी आणि अमित शहा सभागृहात उपस्थित; पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलनावर उत्तराची अपेक्षा असतानाच कामकाज तहकूब

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी लोकसभेतील कामकाजाला सुरुवात होताच काही मिनिटांतच सभागृह अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोघेही शेवटच्या दिवशी सभागृहात उपस्थित होते. मात्र, अपेक्षित चर्चा होण्यापूर्वीच कामकाज थांबवण्यात आल्याने विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत घोषणाबाजी सुरू केली.

राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज आज सुरू झाले होते. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पेपरफुटीच्या प्रकरणासह विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्द्यावर सरकारकडून काय भूमिका मांडली जाते, याकडे सर्वांचे लक्ष होते. विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून या विषयांवर काय उत्तर मिळते, याची प्रतीक्षा होती.

मात्र, लोकसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच सभागृह अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले. यानंतर विरोधी पक्षांच्या खासदारांनी सभागृहात घोषणाबाजी करत सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला.

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी नेमकी काय घडामोड घडते, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. मात्र, पेपरफुटी आणि विद्यार्थी आंदोलनावर सरकारची भूमिका समोर येण्यापूर्वीच लोकसभेचे कामकाज तहकूब झाल्याने विरोधकांमध्ये नाराजी निर्माण झाली असून या घडामोडीने राजकीय वातावरण तापले आहे.

Related to this topic: