हट्टा पोलिस कारवाई

चिखली पाटीजवळ पिस्टलसह तरुणास अटक; हट्टा पोलिसांची धडक कारवाई

Hatta police action: हट्टा पोलीस ने चिखली पाटी व वसमत रोडवर अटक करत एका तरुणाला गावठी पिस्तोल, जिवंत काडतुसे आणि 7.65mm काडतुसे सहित अटक केली.

चिखली पाटीजवळ पिस्टलसह तरुणास अटक; हट्टा पोलिसांची धडक कारवाई

Hatta police action

हट्टा (Hatta police action) : जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या आदेशानुसार अवैध शस्त्रसाठ्याविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेत हट्टा पोलिसांना मोठे यश मिळाले. गुप्त माहितीच्या आधारे चिखली पाटी, वसमत रोड येथे नाकाबंदी करून पोलिसांनी एका 26 वर्षीय तरुणाला गावठी पिस्टल व जिवंत काडतुसांसह अटक केली.

 19 मे रोजी सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास आरोपी सुरजितसिंग सुलतानसिंग टाक रा. फुले नगर, मानवत, जि. परभणी हा गावठी पिस्टल घेऊन परभणीकडे जात असल्याची माहिती हट्टा पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रेड पोउपनि सिरसेवाड व पथकाने चिखली शिवारातील छत्रपती ढाब्यासमोर वसमत रोडवर अचानक नाकाबंदी लावली. यावेळी संशयितास ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक स्टील बॉडीचे, प्लास्टिक मुठीचे व मॅगझिनसह गावठी बनावटीचे पिस्टल तसेच 7.65 एमएमची दोन जिवंत काडतुसे आढळून आली. आरोपी ज्या काळ्या रंगाच्या होंडा युनिकॉर्न मोटारसायकल क्रमांक MH 26 CM 4295 वरून प्रवास करत होता, ती गाडी देखील पोलिसांनी जप्त केली. जप्त केलेल्या पिस्टलची किंमत 25 हजार, काडतुसांची 1 हजार व मोटारसायकलची 40 हजार अशी एकूण 66 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

या (Hatta police action) प्रकरणी पोलीस ठाणे हट्टा येथे गु.र.क्र. 144/2026 कलम 3, 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने विनापरवाना बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगल्याचे निष्पन्न झाले असून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या व चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने पिस्टल जवळ बाळगल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रात्री 9 वाजून 21 मिनिटांनी आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास ग्रेड पोउपनि शेख करीत आहेत. जप्त केलेले पिस्टल आरोपीने कुठून आणले, त्याचा वापर कशासाठी करणार होता व यामागे एखादी टोळी कार्यरत आहे का, या दिशेने पोलीस तपास करत आहेत.

डॉ. निलाभ रोहन यांनी पदभार स्वीकारल्यापासून जिल्ह्यातील गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी अवैध शस्त्रसाठा शोधून काढण्यावर भर दिला आहे. त्यांच्या सूचनेनंतर जिल्ह्यातील तेराही पोलीस ठाण्यांच्या पथकांनी नाकाबंदी, गुप्त माहितीच्या आधारे छापे आणि संशयितांची तपासणी वाढवली आहे. गेल्या काही महिन्यांतच अनेक ठिकाणी गावठी कट्टे व धारदार हत्यारे जप्त करून आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चिखली पाटी येथील या कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

संबंधित सामग्री

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJPच्या शिवाजी पार्क आंदोलनात ७५ वर्षीय गोपालकृष्ण पिल्लईंचा हार्ट अटॅकने मृत्यू. अभिजीत दिपकेंविरोधात हत्येच्या गुन्ह्याची मागणी; आयोजकांवरही FIR.

Oct 04, 2026
विसर्जन बंदोबस्तानंतर छातीत तीव्र वेदना; नागपूर पोलिस ASIचा उपचारादरम्यान मृत्यू

विसर्जन बंदोबस्तानंतर छातीत तीव्र वेदना; नागपूर पोलिस ASIचा उपचारादरम्यान मृत्यू

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तानंतर घरी परतलेल्या नागपूर पोलिस दलातील ASI रवींद्र कोकांडे यांना छातीत तीव्र वेदना झाल्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Sep 28, 2026
डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

लखमापूर येथे प्रतिबंधित डीजे वापरल्याप्रकरणी माहूर पोलिसांची कारवाई; पाच गणेश मंडळांच्या सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल, १.३७ कोटींचा मुद्देमाल जप्त.

Sep 26, 2026
पुण्यात 8 अल्पवयीन मुलांना बेकायदेशीर ताब्यात ठेवून मारहाणीचा आरोप; 11 पोलिसांवर FIR, CIDकडे तपास

पुण्यात 8 अल्पवयीन मुलांना बेकायदेशीर ताब्यात ठेवून मारहाणीचा आरोप; 11 पोलिसांवर FIR, CIDकडे तपास

पुण्यात आठ अल्पवयीन मुलांना बेकायदेशीर ताब्यात ठेवून मारहाण केल्याप्रकरणी 11 पोलिसांवर FIR. मानवाधिकार आयोगानंतर तपास CIDकडे.

Sep 24, 2026
अहिल्यानगरच्या भिंगारमध्ये गणेश विसर्जनाला गालबोट; लाठीचार्जानंतर दीपक वागसकर यांचा मृत्यू, परिसरात तणाव

अहिल्यानगरच्या भिंगारमध्ये गणेश विसर्जनाला गालबोट; लाठीचार्जानंतर दीपक वागसकर यांचा मृत्यू, परिसरात तणाव

भिंगारमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान लाठीचार्जाचा आरोप; दीपक वागसकर यांच्या मृत्यूनंतर तणाव. कार्यकर्त्यांकडून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी.

Sep 24, 2026