DJ Action

डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

लखमापूर येथे प्रतिबंधित डीजे वापरल्याप्रकरणी माहूर पोलिसांची कारवाई; पाच गणेश मंडळांच्या सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल, १.३७ कोटींचा मुद्देमाल जप्त.

डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

DJ Action

१ कोटी ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त; पाच गणेश मंडळांच्या सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल

माहूर : तालुक्यातील लखमापूर येथे गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान प्रतिबंधित डीजे सिस्टीमचा वापर केल्याप्रकरणी माहूर पोलिसांनी पाच गणेश मंडळांच्या सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत डीजेसह चार वाहने असा एकूण १ कोटी ३७ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. दरम्यान, एक डीजे वाहन मिरवणुकीतून निघून गेल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर बंदी असतानाही तसेच पोलिस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन न करता डीजे वाजविण्यात आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. याप्रकरणी लखमापूर बीटचे कॉन्स्टेबल संदीप गोपनवाड यांच्या २४ सप्टेंबर रोजीच्या फिर्यादीवरून लखमापूर येथील पाच गणेश मंडळांच्या सदस्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

या कारवाईदरम्यान चार डीजे आणि त्यांची वाहने असा एकूण १ कोटी ३७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे आणि पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके करीत आहेत.

संबंधित सामग्री

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJPच्या शिवाजी पार्क आंदोलनात ७५ वर्षीय गोपालकृष्ण पिल्लईंचा हार्ट अटॅकने मृत्यू. अभिजीत दिपकेंविरोधात हत्येच्या गुन्ह्याची मागणी; आयोजकांवरही FIR.

Oct 04, 2026
दुष्काळामुळे हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव २०२६ रद्द; खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार

दुष्काळामुळे हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव २०२६ रद्द; खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव रद्द. महोत्सवाचा खर्च दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केला जाणार.

Oct 03, 2026
विसर्जन बंदोबस्तानंतर छातीत तीव्र वेदना; नागपूर पोलिस ASIचा उपचारादरम्यान मृत्यू

विसर्जन बंदोबस्तानंतर छातीत तीव्र वेदना; नागपूर पोलिस ASIचा उपचारादरम्यान मृत्यू

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तानंतर घरी परतलेल्या नागपूर पोलिस दलातील ASI रवींद्र कोकांडे यांना छातीत तीव्र वेदना झाल्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Sep 28, 2026
गणेश विसर्जन मिरवणुकीत गुलालाचा महापूर

गणेश विसर्जन मिरवणुकीत गुलालाचा महापूर

Ganesh Visarjan Procession: गणरायाला निरोप देताना वसमत शहरात  यावर्षी डिजे, ढोल-ताशांचा गजर, यांच्यासह गुलालाची प्रचंड उधळण झाली शेकडो पोते गुलाल मिरवणुकीत उधळण्यात आला

Sep 27, 2026
परभणीत गणेश विसर्जनासाठी गेलेले दोन युवक गोदावरी पात्रात बुडाले

परभणीत गणेश विसर्जनासाठी गेलेले दोन युवक गोदावरी पात्रात बुडाले

परभणीतील धानोरा काळे येथे गणेश विसर्जनानंतर गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेलेले दोन युवक बुडाले. एनडीआरएफ पथकाकडून शोधमोहीम सुरू आहे.

Sep 27, 2026