Chief Minister Relief Fund

दुष्काळामुळे हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव २०२६ रद्द; खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव रद्द. महोत्सवाचा खर्च दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा केला जाणार.

दुष्काळामुळे हिंगोलीतील दांडिया-मस्ती महोत्सव २०२६ रद्द; खर्चाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत देणार

हिंगोली : हिंगोली शहरातील नवा मोंढा भागात दरवर्षी मोठ्या उत्साहात होणारा दांडिया-मस्ती महोत्सव यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. या महोत्सवावर होणारा संपूर्ण खर्च दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात येणार असल्याची घोषणा आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.

युवा फ्रेंड्स असोसिएशन आणि श्रीराम बाल गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी नवरात्रोत्सवात हा भव्य दांडिया महोत्सव आयोजित केला जातो. यंदा जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर असल्याने सामाजिक बांधिलकी जपत हा निर्णय घेण्यात आला आहे.

या कार्यक्रमासाठी येणारा खर्च वाचवून तो थेट शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय मंडळाचे अध्यक्ष केशव दुबे, सागर तापडिया, विशाल बडजाते, सुमित बडेरा, गोपाल बाहेती, डॉ. नितीन पुरोहित, अंकुश जैस्वाल, शैलेश जैस्वाल, संदीप गीते, विशाल सोनी, सावन तोषनीवाल व इतर पदाधिकाऱ्यांच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे.

तसेच जिल्ह्यातील इतर सेवाभावी संस्था आणि दुर्गा देवी मंडळांनीही अशाच प्रकारे उत्सवावरील खर्च टाळून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन युवा फ्रेंड्स असोसिएशन व श्रीराम बाल गणेश मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

संबंधित सामग्री

माणसांसोबत वन्यजीवांनाही दुष्काळाची झळ; पाण्याच्या शोधात वानरांची गावोगावी भटकंती

माणसांसोबत वन्यजीवांनाही दुष्काळाची झळ; पाण्याच्या शोधात वानरांची गावोगावी भटकंती

Wildlife Drought: यंदाच्या पावसाच्या लहरीपणामुळे या परिसरालाही दुष्काळाची तीव्र झळ बसली आहे. त्याचा परिणाम केवळ शेतकरी आणि शेतीवरच नव्हे, तर जंगल परिसरातील वानरांसह विविध वन्यप्राणी व पक्ष्यांवरही..

Oct 06, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

Latur Farmers' Organization: गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकरी संघटनांनी केली. तर मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगाम..

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026