परभणी पोलिस कारवाई

कंटेनरमध्ये २७ जनावरांची अमानुष वाहतूक परभणी पोलिसांनी केली कारवाई...!

Parbhani Police Action: परभणीतील दैठणा पोलिसांनी कंटेनरमध्ये अमानुषपणे वाहतूक केलेल्या २७ जनावरांची सुटका केली. कारवाईत तीन आरोपींवर गुन्हा दाखल.

कंटेनरमध्ये २७ जनावरांची अमानुष वाहतूक परभणी पोलिसांनी केली कारवाई...!

Parbhani Police Action

परभणीतील दैठणा पोलीसांची कारवाई अंदाजित ३४ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त....!

परभणी (Parbhani Police Action) : तालुक्यातील दैठणा परिसरात जनावरांची अमानुष पद्धतीने वाहतूक करणार्‍यांविरुद्ध दैठणा पोलिसांनी धडक कारवाई केली. सोमवार १३ एप्रिल रोजी पहाटे १२.३० वाजण्याच्या सुमारास पाथरी– पोखर्णी मार्गावर ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, (Parbhani Police Action) पाथरीकडून पोखर्णीकडे जाणार्‍या कंटेनर एमएच ०४ जेयू ९६४८) मध्ये २७ जनावरे (गाय व बैल) अत्यंत अमानुषपणे भरून नेली जात असल्याची माहिती दैठणा पोलिसांना रात्री गस्तीदरम्यान मिळाली.या माहितीच्या आधारे दैठणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक जायभाये, चालक विलास भवुरे व पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत कंटेनर अडवून तपासणी केली. तपासणीदरम्यान कंटेनरमध्ये जनावरांना कोणतीही सोय न करता निर्दयपणे कोंबून वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तात्काळ २७ जनावरांची सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविले.

या (Parbhani Police Action) कारवाईत कंटेनरसह जनावरे असा एकूण अंदाजे ३४ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संबंधित चालक व अन्य आरोपींविरुद्ध प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा तसेच इतर संबंधित कलमांनुसार तीन आरोपी साहिल सनोफ अब्दुल करीम रा. जोसई जिल्हा मुझपरनगर उत्तर प्रदेश,तोफिक अब्दुल करीम शेख रा. वागारी तालुका जामनेर जिल्हा जळगाव,सावेज अहसान कसार रा.मानोना जिल्हा सारंगपूर उत्तर प्रदेश यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास दैठणा पोलीस करीत आहेत.

संबंधित सामग्री

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

Parbhani Accused Arrested: पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे आदेशाने स्थागुशा पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद

Oct 02, 2026
परभणी जिल्ह्यातून पाच जणांना केले हद्दपार

परभणी जिल्ह्यातून पाच जणांना केले हद्दपार

Parbhani Criminals Banished: जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दितील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातून  पाच व्यक्तींना हद्दपार करण्यात आले आहे.

Sep 29, 2026
परभणीत मोटार वायर चोरणारे सहा चोरटे ताब्यात

परभणीत मोटार वायर चोरणारे सहा चोरटे ताब्यात

Daithana Police Action: डफवाडी शिवारातील शेतातून मोटारचे वायर चोरी गेल्याच्या प्रकरणात दैठणा पोलिसांनी तपास करत चोरट्यांना ताब्यात घेतले. वायर वितळवून मिळविलेले दोन किलो तांबे..

Sep 29, 2026
परभणीत चुडावा-मरसुळ रेल्वे बायपासला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

परभणीत चुडावा-मरसुळ रेल्वे बायपासला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

Parbhani Railway Farmers Protest: चुडावा-मरसुळ रेल्वे बायपाससाठी प्रस्तावित मार्गाची स्थळपाहणी करण्यासाठी आलेल्या रेल्वे व अधिकार्‍यांना बरबडी, आडगाव व गौर येथील शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

Sep 29, 2026
परभणीतील एका तहसील आवारातील जप्त रेती उपसा बोटीवर कटर!

परभणीतील एका तहसील आवारातील जप्त रेती उपसा बोटीवर कटर!

Parbhani Illegal sand extraction: अवैध रेती उपशाविरोधातील कारवाईत जप्त केलेल्या रेती उपसा बोटीचे लोखंडी पाइप कटरच्या साहाय्याने कापून अवजड साहित्य बोलेरो वाहनातून नेल्याचा प्रकार

Sep 29, 2026