परभणी टिप्पर-मोटारसायकल धडक

परभणीत उभ्या वाळूच्या टिप्परवर मोटारसायकलची भीषण धडक; महावितरणच्या कर्मचार्‍याचा मृत्यू  

Parbhani Tipper-Bike Accident: मानवत  तालुक्यातील केकरजवळा शिवारात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाळूच्या टिप्परला मोटारसायकलची मागून जोरदार धडक बसून महावितरणच्या एका कर्मचार्‍याचा दुर्दैवी मृत्यू

परभणीत उभ्या वाळूच्या टिप्परवर मोटारसायकलची भीषण धडक; महावितरणच्या कर्मचार्‍याचा मृत्यू  

Parbhani Tipper-Bike Accident

 

इंडिकेटर नसलेल्या टिप्परमुळे दुर्घटना घडल्याचा आरोप

परभणी (Parbhani Tipper-Bike Accident) :  मानवत  तालुक्यातील केकरजवळा शिवारात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाळूच्या टिप्परला मोटारसायकलची मागून जोरदार धडक बसून महावितरणच्या एका कर्मचार्‍याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे रामेटाकळीसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पालम तालुक्यातील नाव्हा येथील विष्णू पांडुरंग गयाळ वय ३९ वर्ष हे मानवत तालुक्यातील रामेटाकळी येथील महावितरणच्या उपकेंद्रात वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होते.  गुरुवारी आपले काम आटवून रात्री ते आपल्या एमएच २२ एयू ९४०८ क्रमांकाच्या मोटारसायकल वरून  रामेटाकळीहून पाथरीकडे जात होते. दरम्यान, केकरजवळा शिवारात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एमएच २१ एक्स ६२१३ क्रमांकाच्या वाळू वाहतूक करणार्‍या टिप्परला त्यांच्या मोटारसायकलची मागून जोरदार धडक बसली.

ही घटना शुक्रवार २६ जूनच्या रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान घडली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, संबंधित टिप्पर रस्त्याच्या कडेला उभा असताना त्यावरील इंडिकेटर, पार्किंग लाईट किंवा रिफ्लेक्टर सुरू नव्हते. त्यामुळे अंधारात टिप्पर न दिसल्याने विष्णू गयाळ यांची मोटारसायकल थेट टिप्परच्या मागील भागावर जाऊन आदळली. धडक इतकी भीषण होती की त्यांना गंभीर दुखापत झाली.घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

रात्री  नऊ वाजण्याच्या सुमारास १०८ रुग्णवाहिकेद्वारे त्यांना पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी  तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. महावितरण विभागात कर्तव्यदक्ष व मनमिळावू कर्मचारी म्हणून ओळख असलेल्या विष्णू गयाळ यांच्या अकाली निधनाने महावितरण कर्मचारी, मित्रपरिवार आणि रामेटाकळी परिसरात शोककळा पसरली आहे.

संबंधित सामग्री

मिनीडोर-मोटारसायकलच्या भीषण धडकेत एक ठार

मिनीडोर-मोटारसायकलच्या भीषण धडकेत एक ठार

Mini Truck-Motorcycle Accident: शहरातून जाणाऱ्या हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर ग्रीनपार्कजवळ सोमवारी (दि. ५) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास मिनीडोर आणि मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाली.

Oct 05, 2026
परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

परभणीत सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; स्थागुशा पथकाची कारवाई

Parbhani Accused Arrested: पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे आदेशाने स्थागुशा पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन सराईत घरफोडी करणारा आरोपी जेरबंद

Oct 02, 2026
परभणी जिल्ह्यातून पाच जणांना केले हद्दपार

परभणी जिल्ह्यातून पाच जणांना केले हद्दपार

Parbhani Criminals Banished: जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दितील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यातून  पाच व्यक्तींना हद्दपार करण्यात आले आहे.

Sep 29, 2026
परभणीत चुडावा-मरसुळ रेल्वे बायपासला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

परभणीत चुडावा-मरसुळ रेल्वे बायपासला शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

Parbhani Railway Farmers Protest: चुडावा-मरसुळ रेल्वे बायपाससाठी प्रस्तावित मार्गाची स्थळपाहणी करण्यासाठी आलेल्या रेल्वे व अधिकार्‍यांना बरबडी, आडगाव व गौर येथील शेतकर्‍यांचा तीव्र विरोध

Sep 29, 2026
परभणीतील एका तहसील आवारातील जप्त रेती उपसा बोटीवर कटर!

परभणीतील एका तहसील आवारातील जप्त रेती उपसा बोटीवर कटर!

Parbhani Illegal sand extraction: अवैध रेती उपशाविरोधातील कारवाईत जप्त केलेल्या रेती उपसा बोटीचे लोखंडी पाइप कटरच्या साहाय्याने कापून अवजड साहित्य बोलेरो वाहनातून नेल्याचा प्रकार

Sep 29, 2026