कळमनुरी (Kalamnuri Gutkha-Tobacco seized) : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित गुटखा व तंबाखूची अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी कारसह तब्बल ५ लाख ६९ हजार ८२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर विठ्ठलराव श्रीरामे (वय ३२, रा. पिंपळदरी, ता. जि. हिंगोली) हा १६ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १ वाजता मसोड गावाकडे जाणाऱ्या फाट्याजवळ, बिट क्रमांक ४ मध्ये प्रतिबंधित गुटखा व तंबाखू कारमधून घेऊन जात असताना आढळून आला.
पोलिसांनी एमएच ३२ सी २९४० क्रमांकाची पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार ताब्यात घेतली. कारमध्ये पांढऱ्या रंगाच्या बोऱ्यांमध्ये विमल पान मसाल्याचे छोटे व मोठे पुडे तसेच व्ही-१ तंबाखूचे छोटे व मोठे पाऊच आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या मालाची किंमत ६९ हजार ८२ रुपये, तर कारची अंदाजे किंमत ५ लाख रुपये, अशी एकूण ५ लाख ६९ हजार ८२ रुपये आहे.
या (Kalamnuri Gutkha-Tobacco seized) प्रकरणी फिर्यादी पोलीस नाईक सतीश उत्तमराव जाधव यांच्या तक्रारीवरून कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३८१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा अधिनियमातील संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास आडे करीत आहेत. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नसून प्रकरणाचा तपास सुरू आहे.