परभणी गोवंशीय कत्तल

परभणीतील गंगाखेड शहरात गोवंशीय जनावराची कत्तल

Parbhani Cattle Slaughter: गंगाखेडच्या अराफत कॉलनीत गोवंशीय जनावराची कत्तल झाल्याचा आरोप दोघांवर केला गेला. पोलीसने १५० किलो मांस जप्त केले आणि दोघांना दोन दिवसाची कोठडी सुनावली आहे.

परभणीतील गंगाखेड शहरात गोवंशीय जनावराची कत्तल

Parbhani Cattle Slaughter

 

गोवंशीय जनावराच्या कातडीसह मांस व अन्य अवयव जप्त
दोघांविरुद्ध गंगाखेड पोलिसात गुन्हा दाखल...!

परभणी (Parbhani Cattle Slaughter) : गंगाखेड शहरातील अराफत कॉलनी परिसरात गोवंशीय जनावराची कत्तल झाल्याची घटना शनिवार ३० मे रोजी गंगाखेड पोलिसांनी केलेल्या कारवाईत उघडकीस आली असुन याप्रकरणी रात्री उशिराने दोघांविरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून एकास ताब्यात घेत रविवार ३१ मे रोजी पालम न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, गंगाखेड शहरातील अराफत कॉलनी परिसरात जावेद मुस्तफा खुरेशी नामक इसम गोवंशीय जनावराची कत्तल करीत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांना शनिवार ३० मे रोजी दुपारी मिळाल्याने त्यांनी सपोउपनि शंकर रेंगे व पो.शि. प्रदीप रनशूर यांना मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी पाठवून खात्री करून घेत दुपारी अंदाजे ४:३० वाजेच्या सुमारास पो.नि. श्रीकांत डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिपाली गित्ते, सपोनि शिवाजी शिंगणवाड, सपोउपनि शंकर रेंगे, पो.शि. राहुल खाडे, प्रदिप रनशूर आदींच्या पथकाने जावेद मुस्तफा खुरेशी याच्या घरी छापा मारून पत्राच्या शेडमध्ये पाहणी केली.

गोवंशीय जनावराची कातडी व अन्य अवयवासह तीन पोत्यात भरून ठेवलेले ७५ किलो तसेच बकीटमध्ये आणि जमिनीवर असलेले ७५ किलो असे एकुण १५० किलो मांस, दोन सुऱ्या, एक कुऱ्हाड असा एकुण २४२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. अवधूत गिरी व डॉ. प्रकाश सावणे यांना (Parbhani Cattle Slaughter) घटनास्थळी बोलावून कातडी व मासाचे नमुने तपासणीसाठी घेऊन उर्वरित मांस नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या मदतीने नष्ट करून शनिवार रोजी रात्री उशिराने पो.शि. प्रदिप रनशूर यांच्या फिर्यादीवरून जावेद मुस्तफा खुरेशी व त्याचे वडील मुस्तफा खुरेशी या दोघांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात प्राणी संरक्षण अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून जावेद खुरेशी यास ताब्यात घेऊन रविवार ३१ मे रोजी पालम येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. याचा पुढील सपोनि दिपाली गित्ते, पो. शि. संग्राम शिंदे हे करीत आहेत.

संबंधित सामग्री

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJPच्या शिवाजी पार्क आंदोलनात ७५ वर्षीय गोपालकृष्ण पिल्लईंचा हार्ट अटॅकने मृत्यू. अभिजीत दिपकेंविरोधात हत्येच्या गुन्ह्याची मागणी; आयोजकांवरही FIR.

Oct 04, 2026
विसर्जन बंदोबस्तानंतर छातीत तीव्र वेदना; नागपूर पोलिस ASIचा उपचारादरम्यान मृत्यू

विसर्जन बंदोबस्तानंतर छातीत तीव्र वेदना; नागपूर पोलिस ASIचा उपचारादरम्यान मृत्यू

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तानंतर घरी परतलेल्या नागपूर पोलिस दलातील ASI रवींद्र कोकांडे यांना छातीत तीव्र वेदना झाल्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Sep 28, 2026
डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

लखमापूर येथे प्रतिबंधित डीजे वापरल्याप्रकरणी माहूर पोलिसांची कारवाई; पाच गणेश मंडळांच्या सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल, १.३७ कोटींचा मुद्देमाल जप्त.

Sep 26, 2026
पुण्यात 8 अल्पवयीन मुलांना बेकायदेशीर ताब्यात ठेवून मारहाणीचा आरोप; 11 पोलिसांवर FIR, CIDकडे तपास

पुण्यात 8 अल्पवयीन मुलांना बेकायदेशीर ताब्यात ठेवून मारहाणीचा आरोप; 11 पोलिसांवर FIR, CIDकडे तपास

पुण्यात आठ अल्पवयीन मुलांना बेकायदेशीर ताब्यात ठेवून मारहाण केल्याप्रकरणी 11 पोलिसांवर FIR. मानवाधिकार आयोगानंतर तपास CIDकडे.

Sep 24, 2026
अहिल्यानगरच्या भिंगारमध्ये गणेश विसर्जनाला गालबोट; लाठीचार्जानंतर दीपक वागसकर यांचा मृत्यू, परिसरात तणाव

अहिल्यानगरच्या भिंगारमध्ये गणेश विसर्जनाला गालबोट; लाठीचार्जानंतर दीपक वागसकर यांचा मृत्यू, परिसरात तणाव

भिंगारमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान लाठीचार्जाचा आरोप; दीपक वागसकर यांच्या मृत्यूनंतर तणाव. कार्यकर्त्यांकडून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी.

Sep 24, 2026