सुखदेवानंद विद्यालय

सुखदेवानंद विद्यालय भांडेगावची उज्वल निकालाची परंपरा कायम

Sukhdevananda Vidyalaya: हिंगोलीतील सुखदेवानंद विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एसएससी परीक्षेत 94.91% निकाल साध्य केला. शाळेतून 38 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह उत्तीर्णता मिळवली.

सुखदेवानंद विद्यालय भांडेगावची उज्वल निकालाची परंपरा कायम

Sukhdevananda Vidyalaya

हिंगोली (Sukhdevananda Vidyalaya) : जिजामाता बहुउद्देशीय सेवाभावी व शिक्षण संस्था द्वारा संचलित सुखदेवानंद विद्यालय भांडेगाव तालुका जिल्हा हिंगोली या शाळेचा इयत्ता दहावी एसएससी परीक्षा मार्च 2026 चा निकाल 94.91% लागला असून हनुमान रामप्रसाद पठाडे हा विद्यार्थी 92.80% गुणांसह प्रथम, कु. स्नेहल गंगाराम गांजवे 87.40% गुणांसह द्वितीय, कु.प्रतीक्षा उत्तम पाईकराव 87.20% गुणांसह तृतीय, तर कु. पुनम लक्ष्मण भवर 86.40% गुणांसह चतुर्थ क्रमांकासह उत्तीर्ण झाले आहेत. (Sukhdevananda Vidyalaya) विद्यालयातील  एकूण विद्यार्थ्यांपैकी 38 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून 68 विद्यार्थी प्रथम श्रेणी या वर्गात उत्तीर्ण झालेले आहेत.

सर्व उत्तीर्ण व यशस्वी विद्यार्थ्यांचे जिजामाता बहुउद्देशीय सेवाभावी व शिक्षण संस्था हिंगोलीचे अध्यक्ष आमदार तानाजीराव मुटकुळे, सरचिटणीस ग्यानदेवराव जगताप , कोषाध्यक्ष  दिलीपराव चव्हाण,संस्थेचे उपाध्यक्ष उत्तमराव जगताप, संस्थेचे सहसरचिटणीस  प्रकाश निरगुडे, संस्थेचे संचालक तथा सुखदेवानंद विद्यालय शाळा समितीचे अध्यक्ष  संतोषराव जगताप मुख्याध्यापक  गजानन वैद्य, मुख्याध्यापक  वैजनाथ गाडे, मुख्याध्यापक बाबासाहेब इंगोले, तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी अभिनंदन केले. यावेळी संस्थेचे सह सरचिटणीस प्रकाश निरगुडे, कोषाध्यक्ष दिलीपराव चव्हाण तसेच संस्थेचे सरचिटणीस ग्यानदेवराव जगताप यांनी (Sukhdevananda Vidyalaya) विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालक दत्ता कराळे ,  जगन वाबळे  यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार  घोडेकर यांनी मानले.

संबंधित सामग्री

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

नागपूर पदवीधर मतदारसंघात १४ आमदार आणि २ खासदार मतदान करू शकणार नाहीत. बावनकुळे, नाना पटोले, वडेट्टीवारांसह अनेक नेते यादीत.

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026