Nagpur Graduate Constituency

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

नागपूर पदवीधर मतदारसंघात १४ आमदार आणि २ खासदार मतदान करू शकणार नाहीत. बावनकुळे, नाना पटोले, वडेट्टीवारांसह अनेक नेते यादीत.

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

Nagpur Graduate Constituency

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक; बावनकुळे, नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक दिग्गजांना मतदानाचा अधिकार नाही

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची राजकीय रणधुमाळी सुरू असतानाच लोकप्रतिनिधींशी संबंधित एक रंजक माहिती समोर आली आहे. या निवडणुकीत नागपूर विभागातील १४ आमदार आणि २ खासदारांना मतदान करता येणार नाही. विशेष म्हणजे या लोकप्रतिनिधींचे शिक्षण पदवीपर्यंत पूर्ण झालेले नसल्याने त्यांना पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदार म्हणून सहभागी होता येत नाही.

नागपूर विभागात एकूण ३२ आमदार असून त्यापैकी १४ आमदार पदवीधर मतदारसंघासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण करत नसल्याचे सांगण्यात आले आहे. संबंधित आमदारांचे शिक्षण दहावी, बारावी किंवा पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या-दुसऱ्या वर्षापर्यंत झालेले आहे. त्यामुळे त्यांना या मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळालेला नाही.

पदवीधर मतदारसंघात मतदानासाठी पात्रता काय?

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदार होण्यासाठी संबंधित व्यक्ती पदवीधर असणे आवश्यक आहे. त्यामुळे केवळ आमदार किंवा खासदार असणे पुरेसे ठरत नाही. शैक्षणिक पात्रतेची अट पूर्ण न करणाऱ्या लोकप्रतिनिधींना या निवडणुकीत मतदान करता येत नाही.

याच नियमामुळे नागपूर विभागातील अनेक परिचित राजकीय चेहरे मतदानाच्या अधिकारापासून दूर राहणार आहेत.

बावनकुळे, पटोले, वडेट्टीवारांचाही समावेश

मतदानाचा अधिकार नसलेल्या आमदारांमध्ये भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेसचे नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार, तसेच माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा समावेश आहे.

नागपूर जिल्ह्यात कृष्णा खोपडे (७ वी), चरणसिंह ठाकूर (१२ वी), मोहन मते (ITI), प्रवीण दटके (डिप्लोमा Ist Year) आणि चंद्रशेखर बावनकुळे (B.Sc Ist Year) यांना मतदान करता येणार नाही.

कोणत्या जिल्ह्यातील किती आमदार मतदान करू शकणार नाहीत?

चंद्रपूर जिल्हा:
विजय वडेट्टीवार (१० वी) आणि किशोर जोरगेवार (१० वी) यांचा या यादीत समावेश आहे.

भंडारा जिल्हा:
राजू कारेमोरे (१२ वी) आणि नाना पटोले (B.A. IInd Year) यांना पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही.

गोंदिया जिल्हा:
विनोद अग्रवाल (१२ वी) आणि संजय पुराम (१२ वी) यांचे शिक्षण पदवी पूर्ण होण्यापूर्वीच थांबले असल्याने ते या निवडणुकीत मतदार नाहीत.

गडचिरोली जिल्हा:
माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम (१० वी) यांचा या यादीत समावेश आहे.

वर्धा जिल्हा:
समीर कुणावार (१२ वी) आणि राजेश बकाने (B.A. Ist Year) हे मतदान करू शकणार नाहीत.

दोन खासदारांनाही मतदानाचा अधिकार नाही

या यादीत केवळ आमदारच नाहीत, तर दोन खासदारांचाही समावेश आहे. राज्यसभेच्या खासदार माया इवनाते (५ वी) आणि रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे (B.A. IInd Year) यांनाही पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही.

अशाप्रकारे नागपूर विभागातील राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे १४ आमदार आणि २ खासदार या निवडणुकीत स्वतः मतदार म्हणून सहभागी होऊ शकणार नाहीत. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी असलेल्या शैक्षणिक पात्रतेमुळे ही स्थिती निर्माण झाली आहे.

संबंधित सामग्री

'उद्धव ठाकरेंनंतर आता एकनाथ शिंदेंची शिवसेना फुटणार?' -अतुल लोंढे

'उद्धव ठाकरेंनंतर आता एकनाथ शिंदेंची शिवसेना फुटणार?' -अतुल लोंढे

शिंदेंची शिवसेना फुटणार? महायुतीतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते अतुल लोंढेंच्या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.

Oct 30, 2026
पदवीधर, शिक्षक मतदारसंघांची आचारसंहिता संपुष्टात; मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे आदेश जारी

पदवीधर, शिक्षक मतदारसंघांची आचारसंहिता संपुष्टात; मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे आदेश जारी

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांची आचारसंहिता संपली. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने 29 ऑक्टोबर रोजी आदेश जारी केला.

Oct 30, 2026
नागपुरातील भाजपच्या पराभवाने महायुतीत खळबळ; फडणवीसांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह?

नागपुरातील भाजपच्या पराभवाने महायुतीत खळबळ; फडणवीसांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह?

Maharashtra Legislative Council Election: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नागपुरात काँग्रेसने विजय मिळवल्याने महायुतीमधील राजकीय..

Oct 29, 2026
“भाजपसोबत कधीच जाणार नाही”; नितेश कराळेंचा ठाम पवित्रा, म्हणाले, “मी किंगमेकर बनलो!”

“भाजपसोबत कधीच जाणार नाही”; नितेश कराळेंचा ठाम पवित्रा, म्हणाले, “मी किंगमेकर बनलो!”

नागपूर पदवीधर निवडणुकीतील यशानंतर नितेश कराळेंची प्रतिक्रिया; भाजपमध्ये जाण्यास स्पष्ट नकार, शरद पवारांबद्दल आदर आणि पुढील निवडणुकांवर लक्ष.

Oct 29, 2026
महायुतीच्या पराभवाचे खापर शिंदेसेनेवर? रविंद्र चव्हाण घेणार पदाधिकाऱ्यांची झाडाझडती

महायुतीच्या पराभवाचे खापर शिंदेसेनेवर? रविंद्र चव्हाण घेणार पदाधिकाऱ्यांची झाडाझडती

विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर भाजप अॅक्शन मोडमध्ये. रविंद्र चव्हाण पुणे-नागपूरचा आढावा घेणार; शिंदेसेनेच्या भूमिकेवरून महायुतीत तणाव वाढल्याची चर्चा.

Oct 29, 2026