10th Exam Result: दी आर्य शिक्षण संस्थेच्या भारत माध्यमिक शाळेत पियुष तोष्णीवालने 97.80% गुण मिळवून दहावीच्या परीक्षेत अव्वल स्थान पटकावले.
रिसोड (10th Exam Result) : दी आर्य शिक्षण संस्थेअंतर्गत येणाऱ्या भारत माध्यमिक शाळा रिसोड वर्ग दहावीच्या निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. सत्र 2025 -26 च्या दहावीच्या परीक्षेसाठी 413 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 408 विद्यार्थी उत्तीर्ण झाले टक्केवारी 98.78% एवढा निकाल लागला असून, त्यामध्ये 160 विद्यार्थी प्राविण्यश्रेणीत तर 133 विद्यार्थी प्रथम श्रेणीत 83% विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.
शाळेतील पियुष गोविंद तोष्णीवाल हा विद्यार्थी 97.80% गुण घेऊ प्रथम आला तर कु.सान्वी मुनेश बगडे व कु.आरती ज्ञानेश्वर पारिस्कर यांनी 96.20% गुण घेऊन द्वितीय क्रमांक पटकावला आहे 90% पेक्षा अधिक गुण घेणारे तब्बल 24 विद्यार्थी विद्यार्थिनी असून भारत माध्यमिक शाळेने यशाची परंपरा कायम ठेवली आहे. या (10th Exam Result) सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे संस्थाध्यक्ष माननीय भाऊसाहेब अनंतरावजी देशमुख व बाईसाहेब जयश्रीताई देशमुख अँड. नकुल दादा देशमुख यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना शुभेच्छा दिली प्रसंगी मुख्याध्यापक भांडेकर सर सर्व वर्गशिक्षक शिक्षिका उपस्थित होते.