पोलीस भरती परीक्षा

हिंगोली पोलीस भरती लेखी परीक्षेत 411 पैकी 376 उपस्थित 35 गैरहजर 

Police Recruitment Exam: हिंगोलीत २९ मार्च रोजी पोलीस भरतीची लेखी परीक्षा पार पडली. ४११ पैकी ३७६ उमेदवार उपस्थित होते, ३५ गैरहजर होते.

हिंगोली पोलीस भरती लेखी परीक्षेत 411 पैकी 376 उपस्थित 35 गैरहजर 

Police Recruitment Exam


​हिंगोली (Police Recruitment Exam) : येथील आदर्श महाविद्यालयात 29 मार्च रोजी  पोलीस भरतीची लेखी परीक्षा अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षेचे चोख नियोजन करण्यात आले होते. परीक्षेला एकूण पात्र ठरलेल्या 411 उमेदवारापैकी 376 उमेदवारांनी परीक्षा दिली या परीक्षेला 35 उमेदवार गैरहजर होते. 

आदर्श महाविद्यालयावर लेखी परीक्षा निमित्त​विद्यार्थ्यांना कडक सूचना आणि नियमावली:

परीक्षा (Police Recruitment Exam) सुरू होण्यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांनी उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. "विद्यार्थ्यांनी सोबत केवळ प्रश्नपत्रिका आणि आवश्यक ओळखपत्रच ठेवावे. बॅग, बेल्ट, पाकीट किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य हॉलमध्ये नेण्यास सक्त मनाई आहे," असे त्यांनी स्पष्ट केले. ​परीक्षेदरम्यान होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी अनेक उपाययोजना आखण्यात आल्या होत्या. ​प्रत्येक परीक्षा केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून उमेदवारांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे.
​
चेस्ट नंबरनुसार बैठक व्यवस्था केली होती. प्रत्येक (Police Recruitment Exam) उमेदवाराला त्यांच्या चेस्ट नंबरनुसार दिलेल्या जागेवरच बसणे बंधनकारक करण्यात आले. कोणत्याही गैरप्रकाराचा प्रयत्न केल्यास किंवा बोगस उमेदवार आढळल्यास थेट गुन्हा दाखल करण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला. ​पोलिस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या नेतृत्वाखालील नियोजनबद्ध पोलीस भरती प्रक्रियेबद्दल समाधान व्यक्त होत आहे.

​पोलीस प्रशासनाचा माणुसकीचा चेहरा
​केवळ शिस्तच नाही, तर (Police Recruitment Exam) पोलीस प्रशासनाने संवेदनशीलतेचाही परिचय दिला. लांबून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी पोलीस विभागातर्फे आदर्श कॉलेज परिसरामध्ये नाश्ता आणि चहापाण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली होती. परीक्षेच्या तणावाखाली असलेल्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकांनी या सुविधेचा लाभ घेतला आणि प्रशासनाचे आभार मानले.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026
हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

हिंगोली मारवाडी गल्लीतील भिषण आगीत फटाक्यांचा स्फोट, दोघांचा मृत्यू

Hingoli firecracker explosion: शहरातील मारवाडी गल्ली भागामध्ये गोपाल बासटवार यांच्या घराला सोमवारी रात्री ७.४० च्या सुमारास लागलेल्या भिषण आगीत फटाक्याचा स्फोट होवुन काही जण जखमी झाल्याची घटना

Oct 06, 2026