पोलीस भरती निवड

घोट पोलीस मदत केंद्रात पोलीस भरतीत निवड झालेल्या २१ युवकांचा सत्कार

Police Bharti Selection: घोट येथे जिल्हा पोलीस भरतीत निवड झालेल्या १७ युवकांचा सत्कार आणि राज्य राखीव पोलीस दलात निवड झालेल्या ४ उमेदवारांचा गौरव समारंभ उत्साहात झाला.

घोट पोलीस मदत केंद्रात पोलीस भरतीत निवड झालेल्या २१ युवकांचा सत्कार

Police Bharti Selection

जिल्हा पोलीस दल व राज्य राखीव पोलीस दलात निवड झालेल्या उमेदवारांचा गौरव

घोट () : गडचिरोली जिल्हा पोलीस प्रशासन तथा पोलीस मदत केंद्र घोटच्या वतीने दिनांक १३ मे २०२६ रोजी पोलीस मदत केंद्र घोट हद्दीतील जिल्हा पोलीस भरतीत निवड झालेल्या १७ तसेच राज्य राखीव पोलीस दलात निवड झालेल्या ४ उमेदवारांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक पत्रकार हेमंत उपाध्ये हे होते,तर उद्घाटन घोटच्या सरपंच रूपाली दुधबावरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी (Police Bharti Selection) घोट पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शिंदे,राज्य राखीव पोलीस दलाचे पोलीस उपनिरीक्षक घोलप, पत्रकार इंडिया नगराळे,लिना विश्वास,पवन दुधबावरे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमा दरम्यान मान्यवरांनी नव्याने पोलीस दलात निवड झालेल्या युवकांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जिल्हा पोलीस भरतीत निवड झालेल्यांमध्ये सतीश नानाजी घोती,मोहन धनसिंग घोती, तुशाल शंकर गावतुरे, अश्विनी मनोहर गेडाम, विपुल रामबाबा मडावी, साहील अशोक पुल्लीवार, अमोल वसंत खोबरे,तृप्ती केशव वासेकर,गोपेश गोपाल मंडल,राजीव रोहीदास तुंकलवार,संजना विश्वनाथ कावळे,अमित विश्वनाथ कावळे,धिरेंद्र पांडुरंग बोरकुटे,सचिन मोरेश्वर वासेकर,अश्लेषा पांडुरंग राऊत,अमोल चरणदास बांगरे आणि रुपेश एकनाथ भुरसे यांचा समावेश होता.

तसेच राज्य राखीव पोलीस दलात निवड (Police Bharti Selection) झालेल्या सुरज रामबाबा मडावी,महेश सुधाकर उरकुटे,साई अरविंद वैरागड आणि निमई मंडल यांचाही शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यासोबतच जवाहर नवोदय विद्यालय घोट येथे निवड झालेल्या प्रियांश प्रभाकर बावणे या विद्यार्थ्याचाही विशेष सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला पालक, नागरिक तसेच पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पोलीस अमलदार गौतम दुर्गे यांनी केले, तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल निमगडे व निशिकांत अलगमकर यांनी सहकार्य केले.

संबंधित सामग्री

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJPच्या शिवाजी पार्क आंदोलनात ७५ वर्षीय गोपालकृष्ण पिल्लईंचा हार्ट अटॅकने मृत्यू. अभिजीत दिपकेंविरोधात हत्येच्या गुन्ह्याची मागणी; आयोजकांवरही FIR.

Oct 04, 2026
विसर्जन बंदोबस्तानंतर छातीत तीव्र वेदना; नागपूर पोलिस ASIचा उपचारादरम्यान मृत्यू

विसर्जन बंदोबस्तानंतर छातीत तीव्र वेदना; नागपूर पोलिस ASIचा उपचारादरम्यान मृत्यू

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तानंतर घरी परतलेल्या नागपूर पोलिस दलातील ASI रवींद्र कोकांडे यांना छातीत तीव्र वेदना झाल्या. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Sep 28, 2026
हिंगोलीत श्री विसर्जन मिरवणुकीत पोलीस अधिकारी व कर्मचारी बँडच्या तालावर थिरकले..

हिंगोलीत श्री विसर्जन मिरवणुकीत पोलीस अधिकारी व कर्मचारी बँडच्या तालावर थिरकले..

Hingoli Ganesh immersion: शहरामध्ये दोन दिवसात श्री विसर्जन पार पडले. या बंदोबस्ताच्या ताणतणावातून मुक्त झालेल्या पोलिसांनी रविवारी हिंगोली शहर ठाण्यातील बसविलेल्या श्री चे विसर्जन केले

Sep 27, 2026
डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर माहूर पोलिसांची दबंग कारवाई

लखमापूर येथे प्रतिबंधित डीजे वापरल्याप्रकरणी माहूर पोलिसांची कारवाई; पाच गणेश मंडळांच्या सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल, १.३७ कोटींचा मुद्देमाल जप्त.

Sep 26, 2026
पुण्यात 8 अल्पवयीन मुलांना बेकायदेशीर ताब्यात ठेवून मारहाणीचा आरोप; 11 पोलिसांवर FIR, CIDकडे तपास

पुण्यात 8 अल्पवयीन मुलांना बेकायदेशीर ताब्यात ठेवून मारहाणीचा आरोप; 11 पोलिसांवर FIR, CIDकडे तपास

पुण्यात आठ अल्पवयीन मुलांना बेकायदेशीर ताब्यात ठेवून मारहाण केल्याप्रकरणी 11 पोलिसांवर FIR. मानवाधिकार आयोगानंतर तपास CIDकडे.

Sep 24, 2026