JEE सात्विक गरकळ

जेईई मुख्य परिक्षेत भर जहागीरच्या सात्विक गरकळ चा डंका..!

JEE Satwik Garkal: सात्विक गरकळने JEE मुख्य परीक्षेत 99.42 गुणांसह AIR 9296 च्या स्थानावर येऊन उत्कृष्ट यश संपादन केले. त्याच्या यशामुळे कुटुंब आणि मित्रपरिवारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

जेईई मुख्य परिक्षेत भर जहागीरच्या सात्विक गरकळ चा डंका..!

JEE Satwik Garkal

रिसोड (JEE Satwik Garkal) : भर जहागीर येथील मुळ रहिवासी तथा महसुल प्रशासनात कार्यरत उपजिल्हाधिकारी डॉ. संजय श्रीराम गरकल यांचे सुपुत्र  सात्विक संजय गरकल याने JEE Main 2026 परीक्षेत 99.42 गुण मिळवित अखिल भारतीय स्तरावर (AIR) 9296 क्रमांक प्राप्त करून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे कुटुंबासह मित्र परिवारात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सात्विकच्या (JEE Satwik Garkal) अथक परिश्रम, जिद्द आणि समर्पणामुळे हे यश शक्य झाले.या यशामुळे त्याने JEE Advanced परीक्षेचा मार्ग मोकळा केला असुन देशातील नामांकित NIT महाविद्यालयां मध्ये प्रवेशाची मजबुत संधी निर्माण केली आहे.तसेच आपल्या "डॉक्टर" कुटुंबातील पहिला "अभियंता" होण्याचा मानही त्याने मिळवला आहे. सात्विक ला या परीक्षेत गणित या विषयात 99.95 एवढे गुण मिळाले आहे हे उल्लेखनीय ...

विशेष म्हणजे,मागील वर्षी त्याची बहीण तनिष्का हिनेही 99.54 गुणासह नीट या परीक्षेत AIR 9692 मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले होते.सध्या ती टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज व नायर रुग्णालय,मुंबई येथे एमबीबीएस चे शिक्षण घेत आहे.मुलगी आणि मुलगा या दोघांनीही शैक्षणिक क्षेत्रात मिळवलेल्या या यशामुळे कुटुंबासाठी हा अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण ठरला आहे. AIR 9692 आणि AIR 9296 या क्रमांकातील साम्यही कुटुंबासाठी विशेष आणि संस्मरणीय ठरले आहे. सध्या सात्विकचा पुर्ण भर JEE Advanced परीक्षेवर असुन, भविष्यात नेमके कोणते क्षेत्र निवडायचे हे अद्याप निश्चित केले नसल्याचे त्याने सांगितले.“सध्या चांगल्या महाविद्यालयातुन दर्जेदार पदवी मिळवणे हेच माझे ध्येय आहे,” असे सात्विकने नमूद केले.

यापुर्वीही सात्विकने (JEE Satwik Garkal) नांदेड येथील सीबीएसई बोर्डाच्या दहावी परीक्षेत ज्ञानमाता विद्या विहार शाळेतुन 99.4 टक्के गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला होता.विशेष म्हणजे इंग्रजी,मराठी,गणित आणि आयटी या विषयांत त्याने पैकीच्या पैकी गुण मिळवीत आपली गुणवत्ता सिद्ध केली होती.वडील शासकीय सेवेत असल्यामुळे प्रशासकीय कारणास्तव होणाऱ्या बदल्यांमुळे बदलणारे शहर,शाळा, शिक्षकवर्ग,मित्रवर्ग या सर्व गोष्टींचा दोन्ही मुलांनी आपल्या अभ्यासावर परिणाम न होऊ देता अभ्यासात सातत्य कायम ठेवले.या यशाबद्दल कुटुंबीयांनी देवाप्रती कृतज्ञता व्यक्त केली असुन,नातेवाईक,शिक्षक आणि शुभेच्छुकांचे सततचे मार्गदर्शन, आशीर्वाद आणि पाठबळ या बद्दल मनःपुर्वक आभार मानले आहेत.सात्विकच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे.

संबंधित सामग्री

हिंगोली जिल्ह्यात चौथीचे १०१७ तर सातवीचे ८५५ विद्यार्थी पात्र

हिंगोली जिल्ह्यात चौथीचे १०१७ तर सातवीचे ८५५ विद्यार्थी पात्र

Hingoli Scholarship Exam: हिंगोलीच्या चौथ्या आणि सातव्या कक्षा विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट प्रदर्शन दाखला. 4वी कक्षा मध्ये 1017 तर 7वी कक्षा मध्ये 855 विद्यार्थी पात्र झाले.

Aug 11, 2026
सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ मानोऱ्यात भव्य आक्रोश रॅली !

सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ मानोऱ्यात भव्य आक्रोश रॅली !

Sonam Wangchuck Support: महाराष्ट्रातील शिक्षण संशोधन प्रकरणावर समरथनार्थ एक आंदोलन करणाऱ्यांना लडाखच्या विद्यार्थी व समाजसेवक नेतृत्वाने शिक्कामोर्चा केला. जंतर-मंतर येथे उपोषण

Jul 20, 2026
राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत रामानूजन कोचिंग क्लासच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत रामानूजन कोचिंग क्लासच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

State Abacus Competition: राज्यस्तरीय जि चॅम्प ऑफलाईन आणि ऑनलाईन अबॅकस राज्यस्तरीय स्पर्धेत रामानूजन  कोचिंग क्लासच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी

Jul 17, 2026
स्व. माणिक पोदार स्कूलच्या रिधिमा देशमुखची 'जेईई' परीक्षेत उत्तुंग भरारी!

स्व. माणिक पोदार स्कूलच्या रिधिमा देशमुखची 'जेईई' परीक्षेत उत्तुंग भरारी!

JEE Exam Ridhima Deshmukh: रिधिमा देशमुखने जेईई मेन्समध्ये ९८.०७% गुण आणि जेईई ॲडव्हान्समध्ये ८५५३व्या रँक मिळवून आयआयटी प्रवेशासाठी पथ पाहिली. बारावीच्या बोर्ड परीक्षेतही ८९% गुण

Jun 05, 2026
शेतकऱ्याचा मुलगा झाला क्लास 1 अधिकारी

शेतकऱ्याचा मुलगा झाला क्लास 1 अधिकारी

Officer Amol Ambhore: एक शेतकरी कुटुंबातून शिक्षण पूर्ण करून, शिक्षक म्हणून काम करत असतानाच अमोल अंभोरे यांनी MPSC परीक्षेत यश मिळवून सहाय्यक आयुक्त पदावर निवडून मानाचा तुरा

Jun 03, 2026