Hingoli Scholarship Exam: हिंगोलीच्या चौथ्या आणि सातव्या कक्षा विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट प्रदर्शन दाखला. 4वी कक्षा मध्ये 1017 तर 7वी कक्षा मध्ये 855 विद्यार्थी पात्र झाले.
शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर
हिंगोली (Hingoli Scholarship Exam) : महाराष्ट्र शासनाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता ४ थी व ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत हिंगोली जिल्ह्यातील मोठ्या संख्येने विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
जिल्ह्यातील चौथीच्या ८६६४ विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. त्यापैकी ८३९२ विद्यार्थी परीक्षेला बसले तर २७२ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. यापैकी १०१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ७३३५ विद्यार्थी अपात्र ठरले आहेत. १७३ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती पटकावत जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. चौथ्याच्या विद्यार्थ्यांमध्ये अनघा देशमुख, ईश्वरी खंदारे, वैभव घाटोळ, शिवकांत पडोळे, प्रथमेश पाटील, ताश्वी भुसारे, कार्तिकी वाघ, स्वरा वडकुते, देवांश राऊत, हिंदवी अंभोरे, देवांश पडोळे, लवीक अग्रवाल, पुर्वजा शिंदे, अनुज जाधव, अनुष्का मुंजाळ, अनन्या राजेश मलपिल्लु, आनंदी बेले, स्वराज खेडकर, सक्षम शिवणकर, रुद्विक भुतेकर, अर्णव मोरे, सर्वेश नरवाडे, अशाज शेख, अर्णव बाहेती, गौरांग कोळे यांचा समावेश आहे. सातवीसाठी ६५३३ विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. त्यापैकी ६२१७ विद्यार्थी परीक्षेला बसले तर ३१६ विद्यार्थी अनुपस्थित राहिले.
यापैकी ८५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ५३६२ विद्यार्थी अपात्र ठरले आहेत. १९२ विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले आहेत.शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांना शासनाकडून पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळणार आहे.पात्र झालेल्या सर्व विद्यार्थी व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे जिल्हा शिक्षण विभागाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा शाळेमध्ये सत्कार करून अभिनंदन करण्यात आले आहे. तसेच या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल त्यांच्या पालकांसह कुटूंबियांनी व नातेवाईकांनी देखील त्यांचे अभिनंदन केले आहे. शिष्यवृत्ती पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. चौथी तसेच सातवीच्या शिष्यवृत्ती पात्र झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. तसेच त्यांना मार्गदर्शन करणार्या शिक्षकांचे देखील अभिनंदन केले जात आहे.