Breaking News
  • पुणे शहरात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच दिवसात ४२ गुन्ह्यांची नोंद
  • पावसाची दडी, पाणी स्रोत आटले; टोमॅटो पिकाला टँकरने पाणी देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
  • मुक्ताईनगरात दोन गुटखा तस्कर जेरबंद, वाहन जप्त
  • नाशिकला पुढील 3 दिवसाचा पावसाचा यलो अलर्ट
  • मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस नाही
  • सरकारी कार्यक्रमात आमदारपुत्राचा प्रचार? उमरग्यातील बॅनरवरून वादाची चिन्ह
  • जंतर-मंतरवरील कथित लाठीचार्जचा बुलढाण्यात निषेध; रमाईच्या लेकींचे आंदोलन
  • बुलढाण्यात आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार?
  • सायली खरे यांचा सुरांनी दिला CJP आंदोलनाला पाठिंबा!

होम > करीअर

जेईई परीक्षा रिधिमा देशमुख

स्व. माणिक पोदार स्कूलच्या रिधिमा देशमुखची 'जेईई' परीक्षेत उत्तुंग भरारी!

JEE Exam Ridhima Deshmukh: रिधिमा देशमुखने जेईई मेन्समध्ये ९८.०७% गुण आणि जेईई ॲडव्हान्समध्ये ८५५३व्या रँक मिळवून आयआयटी प्रवेशासाठी पथ पाहिली. बारावीच्या बोर्ड परीक्षेतही ८९% गुण


स्व माणिक पोदार स्कूलच्या रिधिमा देशमुखची जेईई परीक्षेत उत्तुंग भरारी

JEE Exam Ridhima Deshmukh |

 

'जेईई ॲडव्हान्स'मध्ये मिळवला ८५५३ वा रँक; शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा

रिसोड (JEE Exam Ridhima Deshmukh) : गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणाचा वस्तुपाठ घालून देणाऱ्या स्थानिक स्व. माणिक पोदार लर्न स्कूलने शैक्षणिक क्षेत्रात पुन्हा एकदा आपली उज्ज्वल परंपरा सिद्ध केली आहे. शाळेची अत्यंत हुशार आणि जिद्दी विद्यार्थिनी कु. रिधिमा देशमुख (Ridhima Deshmukh) हिने देशातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या 'जेईई'  आणि बारावी बोर्ड परीक्षेत मिळवलेल्या उत्तुंग यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिच्या या यशाने संपूर्ण रिसोड शहर व वाशीम जिल्ह्यात व परिसरात पोदार स्कूलचा डंका वाजला आहे.

​'जेईई' परीक्षेत कौतुकास्पद कामगिरी

​अभियांत्रिकी क्षेत्रातील देशातील सर्वोच्च संस्था म्हणजेच आयआयटी प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या 'जेईई मेन्स' परीक्षेत (JEE Exam Ridhima Deshmukh) रिद्धीमाने ९८.०७ पर्सेंटाईल गुणांची नेत्रदीपक कमाई केली. या यशाच्या जोरावर तिने अत्यंत आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या 'जेईई ॲडव्हान्स'  परीक्षेतही आपली घोडदौड कायम ठेवत, अखिल भारतीय पातळीवर ८५५३ वा रँक पटकावला. तिच्या या यशामुळे देशातील नामांकित आयआयटी संस्थेमध्ये प्रवेश मिळवण्याचा तिचा मार्ग मोकळा झाला आहे.

बोर्ड परीक्षेतही गुणवत्तेचा ठसा

​स्पर्धा परीक्षेची अत्यंत कठीण तयारी करत असतानाच, (JEE Exam Ridhima Deshmukh) रिधिमाने आपल्या शालेय अभ्यासाकडेही दुर्लक्ष होऊ दिले नाही. नुकत्याच जाहीर झालेल्या बारावी बोर्ड परीक्षेत तिने ८९% गुण मिळवून विज्ञान शाखेत उत्कृष्ट यश संपादन केले. स्पर्धा परीक्षा आणि बोर्ड परीक्षा या दोन्ही आघाड्यांवर तिने मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरणारे आहे.

​कठोर परिश्रम आणि 'पोदार पॅटर्न'चे फलित

​रिधिमाने मिळवलेले हे यश म्हणजे तिची अहोरात्र मेहनत, जिद्द आणि स्व. माणिक पोदार स्कूलच्या शिक्षकांचे योग्य नियोजनबद्ध मार्गदर्शन यांचे हे फलित आहे. शाळेमध्ये नियमित घेतल्या जाणाऱ्या चाचण्या, शंका निरसन सत्रे  आणि विद्यार्थ्यांच्या मानसिक तयारीवर दिला जाणारा भर यामुळेच हे यश शक्य झाल्याचे बोलले जात आहे.

​सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

​रिधिमा देशमुखच्या (JEE Exam Ridhima Deshmukh) या देदीप्यमान यशाबद्दल शाळेचे संचालक, प्राचार्य, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी तिचे कौतुक केले. एकाच वेळी जेईई मेन्स, ॲडव्हान्स आणि बारावीत अव्वल येणाऱ्या रिधिमा सध्या रिसोड आणि वाशिम परिसरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

​​"माझ्या या यशाचे श्रेय माझे आई-वडील आणि स्व. माणिक पोदार स्कूलच्या सर्व शिक्षकांना जाते. शाळेने करून घेतलेली तयारी आणि दिलेल्या पाठिंब्यामुळेच मी या कठीण परीक्षेत तणावमुक्त राहून यश मिळवू शकले. भविष्यात उत्तम अभियंता होऊन देशाची सेवा करण्याचा माझा मानस आहे."
-कु. रिधिमा देशमुख (गुणवंत विद्यार्थिनी)

Related to this topic: