Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > महाराष्ट्र

आशा भोसले निधन

प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे 92 व्या वर्षी निधन; शासकीय सन्मानाने होणार अंत्यसंस्कार

Asha Bhosle Passed Away: आशा भोसले यांचे ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यावर शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या निवासस्थानी उद्या चाहते अंतिम दर्शन घेऊ शकतील.


प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे 92 व्या वर्षी निधन शासकीय सन्मानाने होणार अंत्यसंस्कार

Asha Bhosle Passed Away |

मुंबई (Asha Bhosle Passed Away) : प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले आहे. शनिवारी त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु सर्वतोपरी प्रयत्न करूनही त्यांना वाचवता आले नाही. त्यांचे पुत्र, आनंद भोसले यांनी आशा भोसले यांच्या निधनाची बातमी दिली.

शासकीय सन्मानाने होणार अंत्यसंस्कार

राज्यमंत्री आशिष शेलार म्हणाले की, "आज संपूर्ण देश आणि महाराष्ट्र एका युगाच्या समाप्तीबद्दल शोक व्यक्त करत आहे. त्यांचे कार्य आणि संगीत केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी आनंदाचा स्रोत होते. उद्या, सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत, त्यांचे चाहते लोअर परळ येथील त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शन घेऊ शकतील. दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्यावर पूर्ण शासकीय सन्मानाने अंतिम संस्कार केले जातील."

आशा भोसले यांची नात जनाई भोसले यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले की, छातीच्या संसर्गामुळे आशा भोसले यांना शनिवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अनेक अवयव निकामी झाल्यामुळे त्यांचे निधन झाले.

प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले म्हणाले की, "आज माझ्या आईचे निधन झाले. त्या राहत असलेल्या लोअर परेलमधील 'कासा ग्रांडे' येथे उद्या सकाळी 11 वाजता लोक त्यांना अंतिम दर्शन घेऊ शकतात. उद्या दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील."

Related to this topic: