जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय: जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

Collector Yogesh Kumbhejkar: जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितले की, रिसोडमध्ये आयोजित महसूल समाधान शिबिरातून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण

शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय: जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

Collector Yogesh Kumbhejkar

 

रिसोड मध्ये महसूल समाधान शिबिरातून जनकल्याणकारी योजनांचा जागर!

रिसोड (Collector Yogesh Kumbhejkar) : ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर” हे नागरिकांसाठी एक प्रभावी माध्यम ठरत असल्याचे प्रतिपादन वाशिमचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर (Collector Yogesh Kumbhejkar) यांनी केले. रिसोड तहसील कार्यालयात ८ मे रोजी आयोजित या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

​महसूल प्रशासनाच्या वतीने आयोजित या शिबिराच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर होत्या. यावेळी मंचावर मुख्याधिकारी सतीश शेवदा, भूमी अभिलेख कार्यालयाचे अधीक्षक राजेंद्र मोरे, पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी दत्ता धवणे, नगराध्यक्ष भगवानराव क्षीरसागर, ॲड. नकुलदादा देशमुख, अमृताताई देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

​योजनांचा जागर आणि प्रशासकीय सक्रियता
​कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. प्रास्ताविक करताना तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी सांगितले की, या शिबिराच्या माध्यमातून शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना एकाच छताखाली विविध योजनांची माहिती देऊन लाभ मिळवून दिला जात आहे. त्यांनी यावेळी महसूल कर्मचारी, मंडळ अधिकारी आणि ग्राम महसूल सेवकांच्या कामाचे विशेष कौतुक केले.

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
​मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी कुंभेजकर म्हणाले की, रिसोड महसूल प्रशासन विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत आहे. नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेताना काही अडचण आल्यास थेट संबंधित विभागाशी संपर्क साधून त्याचे निराकरण करून घ्यावे. प्रशासनाचे दार सर्वसामान्यांसाठी सदैव उघडे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
​
विविध विभागांचे स्टॉल्स आणि सांस्कृतिक आकर्षण
​शिबिरामध्ये नागरिकांच्या सोयीसाठी विविध 16 विभागांचे मार्गदर्शन स्टॉल्स लावण्यात आले होते,  या मध्ये निकाली काढलेल्या फेरफारांची संख्या 150,सातबारा मधील दुरुस्त केलेल्या नोंदणीची संख्या 130, डिजिटल सातबारा वाटप 230, जिवंत सातबारा वाटप 24,प्रमाणपत्र संख्या 122, भूसंपादन निकाली काढलेले प्रकरण संख्या 75, अ कृषक परवानगी 5,वर्ग दोन चे एक करणे 50, तुकडे बंदी नोंदी 3, दिव्यांग अनुदान वाटप 5, भुमिअभिलेख मार्फत सनद 5,एन सी एम सी स्मार्ट कार्ड 102, बेबी केअर किट 2, रमाई घरकुल मंजुरी आदेश 16, उमेद अभियान अंतर्गत बचत गटांना कर्ज वाटप 6 करण्यात आले.

​आपले सरकार महा सेवा केंद्र
​या शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे लहान मुलांनी सादर केलेला छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडा. या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन गौरी काष्टे यांनी केले, तर धनंजय काष्टे यांनी आभार मानले. या शिबिराला रिसोड परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यु एस नप्ते, मंडळ अधिकारी, स्वप्निल धांडे ग्राम महसूल अधिकारी, किशोर अवचार ग्राम महसूल अधिकारी, धनंजय काष्टे, ग्राम महसूल अधिकारी, विक्रम सुर्वे ग्राम महसूल अधिकारी, कुमारी श्रद्धा रेंगे ग्राम महसूल अधिकारी व तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी, सर्व महसूल सेवक यांनी अथक परिश्रम घेतले.

संबंधित सामग्री

रिसोड तहसील कार्यालयाचा उपक्रम: महसूल लोक अदालतीतून ८ शेतरस्त्यांचे वाद सामंजस्याने निकाली

रिसोड तहसील कार्यालयाचा उपक्रम: महसूल लोक अदालतीतून ८ शेतरस्त्यांचे वाद सामंजस्याने निकाली

Risod Revenue Lok Adalat: शेतात ये-जा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या शेतरस्त्यांचे प्रलंबित वाद 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियाना'अंतर्गत रिसोड तहसील कार्यालयात सामंजस्य

Oct 06, 2026
रिसोड तालुक्यात दुष्काळी सावटाखाली पीक पंचनामे युद्धपातळीवर सुरू

रिसोड तालुक्यात दुष्काळी सावटाखाली पीक पंचनामे युद्धपातळीवर सुरू

Risod Taluka Drought: यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे रिसोड तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, महसूल प्रशासनाने नुकसानीच्या पीक पंचनाम्यांना गती दिली आहे.

Oct 05, 2026
उन्हाच्या तीव्रतेसोबतच रिसोड तालुक्यात पाणीटंचाईचे सावट; पळसखेड प्रकल्पात केवळ ४.०८ टक्के साठा

उन्हाच्या तीव्रतेसोबतच रिसोड तालुक्यात पाणीटंचाईचे सावट; पळसखेड प्रकल्पात केवळ ४.०८ टक्के साठा

Risod Taluka Water Scarcity: उन्हाचा पारा दिवसागणिक वाढत चालल्याने रिसोड तालुक्यातील जलसाठ्यांची स्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. वाढत्या तापमानामुळे आगामी काळात तीव्र पाणीटंचाईचे स्पष्ट संकेत

Oct 04, 2026
आसोला ग्रामस्थांना दोन विद्युत रोहित्र उपलब्ध; आमदार भावनाताई गवळी यांच्या प्रयत्नांना यश

आसोला ग्रामस्थांना दोन विद्युत रोहित्र उपलब्ध; आमदार भावनाताई गवळी यांच्या प्रयत्नांना यश

आसोला गावातील चार महिन्यांपासून जळालेले दोन विद्युत रोहित्र आमदार भावनाताई गवळी यांच्या प्रयत्नांतून उपलब्ध झाले. त्यामुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

Sep 27, 2026
भरधाव रेतीचा टिप्पर पलटी; चालक जखमी

भरधाव रेतीचा टिप्पर पलटी; चालक जखमी

Risod sand tipper accident: रिसोड–लोणी मार्गावर गुरुवारी, दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास नवीन वन उद्यानाजवळ भरधाव रेती वाहतूक करणारा टिप्पर पलटी झाल्याची घटना घडली.

Sep 24, 2026