भगवान महावीर स्वामी

रिसोड नगरीत अहिंसा, सत्य आणि शांतीचा संदेश

Lord Mahavir Swami: रिसोड नगरीत जैन धर्मियांनी भगवान महावीरांच्या जन्मकल्याणक महोत्सवाचे भव्य सेलिब्रेशन केले, ज्यात आध्यात्मिकता आणि सांस्कृतिक प्रदर्शन दिसून आले.

रिसोड नगरीत अहिंसा, सत्य आणि शांतीचा संदेश

Lord Mahavir Swami

भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळा भक्तिमय उत्साहात साजरा

रिसोड (Lord Mahavir Swami) : जैन धर्मियांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांच्या २६२५ व्या जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त रिसोड नगरीत भक्ती, उत्साह आणि आध्यात्मिक वातावरणाचा संगम पाहायला मिळाला. संपूर्ण शहरात मंगलमय वातावरण निर्माण झाले होते आणि भाविकांनी मोठ्या श्रद्धेने या सोहळ्यात सहभाग घेतला. या पवित्र दिनाचे औचित्य साधून श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर (Lord Mahavir Swami) येथून भव्य पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे काटेकोर पालन करत, शिस्तबद्ध आणि सुसंस्कृत पद्धतीने ही मिरवणूक पार पडली. पारंपरिक वेशभूषेत सजलेले भाविक, हातात ध्वज, पताका आणि धार्मिक घोषवाक्ये देत वातावरण अधिकच भारावून टाकत होते.


या मिरवणुकीत ज्येष्ठ नागरिकांसह युवक-युवती आणि लहान मुला-मुलींचा उत्स्फूर्त सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. लहानग्यांच्या उत्साहाने आणि महिलांच्या सहभागाने मिरवणुकीला वेगळेच आकर्षण प्राप्त झाले होते. मिरवणूक जैन मंदिर, अप्पा स्वामी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, चांदणी चौक अशा प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. मार्गक्रमणादरम्यान ठिकठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करून मिरवणुकीचे स्वागत केले. तसेच काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व अल्पोपहाराचीही व्यवस्था करण्यात आली होती.

संपूर्ण परिसर "भगवान महावीर स्वामी की जय" (Lord Mahavir Swami) या घोषणांनी दुमदुमून गेला होता. या सोहळ्यामुळे शहरात बंधुता, शांतता आणि एकात्मतेचा सुंदर संदेश पसरला. मिरवणूक पुन्हा जैन मंदिरात परतल्यानंतर भगवान महावीर स्वामी यांचा विधीपूर्वक अभिषेक व पूजन करण्यात आले. यावेळी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने प्रार्थना करून आपल्या जीवनात अहिंसा, सत्य आणि संयम यांचे पालन करण्याचा संकल्प केला. या भव्य सोहळ्यामुळे रिसोड नगरीत दिवसभर धार्मिक उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. भगवान महावीरांच्या शिकवणुकीचा संदेश जनमानसात पोहोचवणारा हा महोत्सव संस्मरणीय ठरला.

संबंधित सामग्री

रिसोड तहसील कार्यालयाचा उपक्रम: महसूल लोक अदालतीतून ८ शेतरस्त्यांचे वाद सामंजस्याने निकाली

रिसोड तहसील कार्यालयाचा उपक्रम: महसूल लोक अदालतीतून ८ शेतरस्त्यांचे वाद सामंजस्याने निकाली

Risod Revenue Lok Adalat: शेतात ये-जा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या शेतरस्त्यांचे प्रलंबित वाद 'महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियाना'अंतर्गत रिसोड तहसील कार्यालयात सामंजस्य

Oct 06, 2026
रिसोड तालुक्यात दुष्काळी सावटाखाली पीक पंचनामे युद्धपातळीवर सुरू

रिसोड तालुक्यात दुष्काळी सावटाखाली पीक पंचनामे युद्धपातळीवर सुरू

Risod Taluka Drought: यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे रिसोड तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, महसूल प्रशासनाने नुकसानीच्या पीक पंचनाम्यांना गती दिली आहे.

Oct 05, 2026
उन्हाच्या तीव्रतेसोबतच रिसोड तालुक्यात पाणीटंचाईचे सावट; पळसखेड प्रकल्पात केवळ ४.०८ टक्के साठा

उन्हाच्या तीव्रतेसोबतच रिसोड तालुक्यात पाणीटंचाईचे सावट; पळसखेड प्रकल्पात केवळ ४.०८ टक्के साठा

Risod Taluka Water Scarcity: उन्हाचा पारा दिवसागणिक वाढत चालल्याने रिसोड तालुक्यातील जलसाठ्यांची स्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. वाढत्या तापमानामुळे आगामी काळात तीव्र पाणीटंचाईचे स्पष्ट संकेत

Oct 04, 2026
आसोला ग्रामस्थांना दोन विद्युत रोहित्र उपलब्ध; आमदार भावनाताई गवळी यांच्या प्रयत्नांना यश

आसोला ग्रामस्थांना दोन विद्युत रोहित्र उपलब्ध; आमदार भावनाताई गवळी यांच्या प्रयत्नांना यश

आसोला गावातील चार महिन्यांपासून जळालेले दोन विद्युत रोहित्र आमदार भावनाताई गवळी यांच्या प्रयत्नांतून उपलब्ध झाले. त्यामुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

Sep 27, 2026
भरधाव रेतीचा टिप्पर पलटी; चालक जखमी

भरधाव रेतीचा टिप्पर पलटी; चालक जखमी

Risod sand tipper accident: रिसोड–लोणी मार्गावर गुरुवारी, दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास नवीन वन उद्यानाजवळ भरधाव रेती वाहतूक करणारा टिप्पर पलटी झाल्याची घटना घडली.

Sep 24, 2026